आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा गव्हाच्या बाजारपेठेतही ‘नमो नमो’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एरवी पंजाब व मध्य प्रदेशातून येणार्‍या गव्हाने बाजारपेठ काबीज केलेली असते. परंतु यंदा स्थानिक गहू गारपीट आणि वादळी पावसाने खराब झाला. हीच परिस्थिती मध्य प्रदेश आणि पंजाबमध्येही राहिली. परिणामी गव्हाच्या बाजारपेठेत गुजतरातच्या धान्याचेच साम्राज्य असल्याचे चित्र आहे. संपूर्ण देशात मोदी फिव्हर आणि गहू बाजारातही ‘नमो नमो’ म्हणायची पाळी आली आहे.

स्थानिक गव्हापेक्षा पॉलिश आणि साफसफाई करून विक्रीसाठी आलेल्या या गव्हासाठी थोडे जास्तीचे पैसे मोजावे लागत असले तरी या गव्हाच्या खरेदीकडेच लोकांचा कल आहे. दुसरा चांगला गहू बाजारात उपलब्ध नसल्यामुळे आकर्षक पॅकिंगच्या गव्हाची दोन हजार ते बावीसशे, तर शरबतीसाठी दोन हजार 500 रुपये ते 2800 रुपये क्विंटल दराने खरेदी करावी लागत आहे. हा गहू आकर्षक पाणीरोधक पिशवीत असून निवडलेलाही आ