आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नान्नज, नरोटेवाडी अडकले निर्बंधांच्या कचाट्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, नरोटेवाडी गावे माळढोक अभयारण्याच्या निर्बंधामुळे सर्वाधिक प्रभावित झाली असल्याचा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाने केलेले पाहणी दरम्यान दिसून आला आहे, असे सामाजिक संकुल विभागाचे संचालक डॉ. ई. एन. अशोककुमार यांनी सांगितले.

सोलापूर विद्यापीठाच्या ग्रामीण विभागाने निर्बंधामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच गावांतील सामाजिक जीवन कसे प्रभावित होते आहे, याचे विवेचन अहवालाद्वारे तयार केले आहे. यात नरोटेवाडी, नान्नज, कारंबा, अकोलेकाटी व मार्डी गावांचा समावेश आहे. सर्वेक्षण दरम्यान आढळलेल्या महत्त्वाच्या मुद्यांकडे डॉ. अशोककुमार यांनी लक्ष वेधले आहे.

या पाचही गावांमध्ये विविध निर्बंधांचे वेगवेगळे परिणाम झाले आहेत. नान्नज गावामध्ये इलेक्ट्रिक फेन्सिंग लावण्यावर असणारी बंदी शेती व्यवसायावर परिणाम करणारी ठरली आहे, त्याखालोखाल जळण मिळण्यावरील निर्बंध याकडे येथील नागरिकांनी लक्ष वेधले आहे. विहीर खोदाई तसेच खते-औषधे वापरावरील निर्बंध येथे तितकेसे जाचक वाटत नाहीत. मार्डी गावातील सर्वेक्षण सांगते की, जळण गोळा करण्यावरील बंधन सर्वात जाचक वाटते. त्याखालोखाल गवत कटाईवरील बंदीही वाटते. पीकपद्धतीवरील बंधने तितकीशी जाचक वाटत नाहीत. नरोटेवाडी, कारंबा व अकोलेकाटी या तीनही गावांतील लोकांना जळण गोळा करण्यावरील बंदी जास्त कठीण वाटते. सर्वेक्षणानुसार निर्बंधाबाबत व्यक्तीनिहाय विविध समस्या जाणवत आहेत. तरीही नान्नज गाव हे शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून आहे, म्हणूनच माळढोक आरक्षण निर्बंधाचे येथील सामाजिक जीवनावर सर्वाधिक परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. कारंबा गावासाठी याचा फारसा परिणाम जाणवत नाही.

विविध बाबींचा उलगडा - सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील ग्रामीण विकास विभागाच्या पुढाकारातून माळढोकप्रश्नी सर्वेक्षणावर आधारित पाहणी अहवाल अंतिम टप्प्यात आहे. सर्वेक्षणातून विविध बाबी समोर येत आहेत.’’ प्रा. डॉ. ई. एन. अशोककुमार, संचालक, सामाजिक शास्त्र संकुल