आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nandkumar Suravanshi President Medal On Independence Day Solapur

नंदकुमार सूर्यवंशी यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहर पोलिस आयुक्तालयातील वेल्फेअर विभागाचे पोलिस निरीक्षक नंदकुमार सूर्यवंशी यांना मंगळवारी राष्ट्रपती पोलिसपदक जाहीर.
सूर्यवंशी हे मूळचे कर्‍हाड तालुक्यातील भोईवाडीतील रहिवासी. आई-वडील शेतकरी. बालपणीच आईचे छत्र हरपले. जिद्दीने शिक्षण घेत यशाची कमान त्यांनी सर केली. 1978 मध्ये ते पुण्यात पोलिस शिपाई म्हणून भरती झाले. 1990 साली खात्याअंतर्गत फौजदार परीक्षा पास झाल्यानंतर मुंबईत बदली झाली. पुणे, मुंबई, लोहमार्ग, वाहतूक शाखा या ठिकाणी काम केले. 2004 मध्ये साहाय्यक निरीक्षकपदी बढती मिळाली. जून 2010 पासून ते पोलिस निरीक्षक म्हणून सोलापुरात कार्यरत आहेत.
आतापर्यंत मिळालेले पुरस्कार - सूर्यवंशींना दोनवेळा पोलिस महासंचालक पदक व दोनदा उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला. रांका ज्वेलर्स दुकानातील चोरी उघडकीस आणल्यामुळे पुण्यात त्यांना एकलाखाचे बक्षीस मिळाले.