आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणीजचे भावी पीठाधीश कानिफनाथ महाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाणीज - श्रीक्षेत्र नाणीज धामचे भावी पीठाधीश म्हणून नरेंद्र महाराज यांचे चिरंजीव कानिफनाथ यांची नियुक्ती करण्यात आली. योग्य वेळ येताच त्यांचा पट्टाभिषेक होईल, अशी घोषणा नरेंद्र महाराजांनी केली.

सुंदर गडावर दोन दिवस संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त मोठा सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, जगद्गुरू हंसदेवाचार्यजी महाराज, माधवाचार्यजी महाराज यांच्यासह अनेक साधू- संतांच्या बैठकीत कानिफनाथ यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. ‘यापुढे कानिफनाथ यांना पीठाच्या परंपरा, पीठाधिशाचे आचरण कसे असावे याबाबत माहिती दिली जाईल. वेळ येताच पट्टाभिषेक होईल,’ असे नरेंद्र महाराज म्हणाले.

संप्रदाय वाढवूया
कानिफनाथ महाराज सध्या अध्यात्मावर पीएच.डी. करत आहेत. ‘हे पद मी आनंदाने स्वीकारतो आहे. माझ्या नियुक्तीबद्दल मी भक्तांचा आभारी आहे. सध्या आपण स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहोत. सर्वांनी मिळून संप्रदायाचे काम करू या व संप्रदाय मोठा करूया,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.