आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसर्‍यांची घरे बांधणारा मोची समाज उपेक्षितच- कॉ. नरसय्या आडम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बांधकाम क्षेत्रात मोलमजुरी करणारा मोची समाज स्वमालकीच्या घरापासून वंचितच आहे. त्यांना घरे मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला. जांबमुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. संस्थाध्यक्ष कुरमय्या म्हेत्रे अध्यक्षस्थानी होते.
जुना एम्प्लॉयमेंट चौकजवळ इंद्रप्रस्थ सभागृहात झालेल्या सभेत सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांना मार्गदर्शन करताना आडम म्हणाले, ‘‘मोची समाजातील पुरुष, महिला भल्या पहाटेच कामाच्या शोधात घराबाहेर जातात. महिला कचरा वेचतात. बांधकामावर वेठबिगारी करतात. पुरुष मिळेल ती कामे करून घरी येतात. अठराविश्व दारिद्रय़, निरक्षरता अशा गर्तेत असलेल्या समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी गृहनिर्माण संस्था स्थापन केली.
त्याच्या माध्यमातून दोन हजार घरे बांधणारच.’’ या वेळी अँड. एम. एच. शेख, नगरसवेक माशप्पा विटे, प्रा. अब्राहम कुमार, रंगप्पा मरेड्डी, भालचंद्र म्हेत्रे आदी उपस्थित होते. गजेंद्र दंडी यांनी अहवाल वाचन केले. सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. जांबुवंत सेनेचे शहराध्यक्ष हणमंतु जंगम, कुमार जंगडेकर, युवक अध्यक्ष सुनील म्हेत्रे, शरणप्पा चलवादी, सुरेश भंडारे, बालप्पा म्हेत्रे, नागू म्हेत्रे आदींचा सत्कार करण्यात आला.