आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला जनता कंटाळली; नरेंद्र मोदींचा थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - गेल्या साठ वर्षांत देशवासीयांनी काँग्रेसला ताकद दिली. मात्र, ते देशाचा सर्वांगीण विकास करण्यात कमी पडले. विकासाऐवजी त्यांनी भ्रष्टाचार, सांप्रदायिकतेला प्रोत्साहन दिल्याने देशाची अधोगती झाली. त्यामुळे जनता काँग्रेसला कंटाळली आहे, हे सुरुवातीच्या तीन टप्प्यांतील मतदानाच्या आकडेवारीवरून दिसते, असे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी म्हटले. शुक्रवारी संध्याकाळी एकाचवेळी पंढरपूरसह देशातील शंभरहून अधिक शहरांतील नागरिकांशी मोदींनी ‘थ्रीडी’ तंत्रज्ञानाद्वारे मतदारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.

मोदी म्हणाले, ‘काँग्रेसमुळे देशासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कुपोषण, ग्रामीण आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. परिणामी बालकांना, गर्भवती मातांना जीव गमवावा लागत आहे. महिला, मुलीही असुरक्षित आहेत. शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचा दाम मिळत नाही. पर्यटनामुळे रोजगाराच्या संधी मिळू शकतात. मात्र, काँग्रेसने त्याचा विकास केला नाही. यामुळे मतदारांसह विशेषत: युवक जागरूक झाला आहे. तरुणाईच्या सोशल साइट्सवरील सत्ताधार्‍यांच्या विरोधातील कॉमेंट्सही अफलातून आहेत.’
विरोधक जेवढी टीका करतील तेवढ्याच ताकदीने निवडणूक निकालानंतर आमचे कमळ फुलून येईल, असेही मोदी म्हणाले.