आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Bharat Vijay Rally, Divya Marathi

नरेंद्र मोदी आज होम मैदानावर गरजणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची ‘भारत विजय रॅली’अंतर्गत बुधवारी होम मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यासाठी होम मैदानावर मंच उभारण्यात आला असून, सुमारे दोन लाख लोक बसतील असे नियोजन करण्यात आले आहे. मोदी यांची सुरक्षा व्यवस्था ध्यानात घेऊन मंच तीन बाजूने बंदिस्त करण्यात आला आहे.


निमंत्रित आणि महिलांसाठी मंचासमोरील सुरक्षित जागेसमोर (डी झोन) दोन हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानावर असलेले खड्डे बुझवण्यात आले असून बुधवारी सकाळी झाडलोट करण्यात येणार आहे. मैदानावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


हे असतील मंचावर : नरेंद्र मोदी, महायुतीचे उमेदवार अँड. शरद बनसोडे (सोलापूर), सदाभाऊ खोत (माढा), भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सिद्रामप्पा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, रिपाइंचे नेते राजाभाऊ सरवदे, प्रा. अशोक निंबर्गी, भाजपचे संघटनमंत्री सुनील कर्जतकर.


मोदी काय बोलणार?
सोलापूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मोदी हे कशा रीतीने हल्लाबोल करतील याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यांच्या भाषणातील काय मुद्दे असतील, एलबीटीचा मुद्दा असणार का, याचीही उत्सुकता आहे.


सातरस्ता - मोदी चौकी, स्टेशन, भय्या चौक, कल्पना टॉकीज कोपरा, नवी वेस पोलिस चौकी, पांजरपोळ चौक, बस स्थानक.
रंगभवन ते सिव्हिल चौक, किडवाई चौक, बेगम पेठ चौकी, पंचकट्टा, दत्त चौक, शिंदे चौक, भागवत टॉकीजजवळून बस स्थानक
सातरस्ता चौक, मोदी चौकी, कुमार चौक, चांदणी चौक, महापौर बंगला, रामलाल चौक, सरस्वती चौक, नवी वेस ते बस स्थानक.
रेल्वे स्टेशन व एसटी स्टँडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग
मंगळवेढा, देगाव, पुणे रस्ता आल्यास : चार पुतळा जलतरण तलावाच्या बाजूला, इंदिरा गांधी स्टेडियम बाजूला
श्रमिक पत्रकार संघासमोरील मैदान.
विजापूर, होटगी रोडवरून आल्यास : हरिभाई देवकरण प्रशाला पाठीमागील मैदान, जुना होमगार्ड मैदान, संगमेश्वर कॉलेज बाजूचे मैदान
अक्कलकोट रस्त्यावरून आल्यास : आदर्श नगर मोकळे मैदान, रंगभवन इदगाह मैदान, अश्विनी रुग्णालयाच्या समोरील मैदान
तुळजापूर, हैदराबाद रस्त्यावरून आल्यास : सिध्देश्वर मंदिर पंचकट्टा तलावाशेजारी, सिध्देश्वर शॉपिंग सेंटर, सिध्देश्वर कन्या प्रशाला मैदान
या ठिकाणी आहे पार्किंग व्यवस्था : सभा दुपारी 3.30 वा.

मोदी यांच्या सभेसाठी पाचशे पोलिसांचा ताफा सज्ज आहे. विमानतळ, होटगी रस्ता आणि होम मैदान या तीनही ठिकाणी वेगळा बंदोबस्त असेल. मंगळवारी दुपारी विमानतळ ते होम मैदान मार्गावर मोदी यांच्या वाहन ताफ्यांची रंगीत तालीम झाली. बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांना मैदानावर एकत्रित जमवून बंदोबस्त देताना घ्यायच्या काळजीबाबत सूचना देण्यात आल्या.


यावेळी पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे, पी. आर. पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप चौगुले, निरीक्षक मोहन शिंदे, अनिल दबडे उपस्थित होते. गुजरातचे पोलिस महासंचालक गौतम आणि उपायुक्त, दिल्लीचे सुरक्षा पथक होम मैदानावर दिवसभर आढावा घेत होते. स्थानिक बीडीडीएस (बॉंबशोधक-नाशक) पथकानेही मैदानाची पाहणी केली.


येथे रस्ता बंद असेल : मार्केट पोलिस चौकी ते जनरल स्टोअर्स रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय ते वोरोनोको प्रशाला कॉर्नर, विर्शाम नगर समोर, बालविकास शाळा कोपरा, डफरीन चौक (दमाणी ब्लड बॅंकजवळ), आंबेडकर पुतळा, ट्रेझरी बॅंकसमोर, पंचकट्टा, नॉर्थकोट प्रशाला गेटजवळ, सिद्धेश्वर कन्या प्रशालेसमोर, शुभराय आर्ट गॅलरी, नवल पेट्रोल पंप, विधाता बंगला ते जुना झांबरे रुग्णालय, सिव्हिल चौक, चार पुतळा चौक, पूनम चौक गेट या ठिकाणचे रस्ते दुपारनंतर बंद असतील.


होटगी रस्ता दुपारनंतर बंद : मोदींची सभा सव्वातीनच्या सुमाराला असल्यामुळे दुपारी दोनपासून विमानतळ, आसरा, जुना होटगी नाका, सातरस्ता, रंगभवन ते होम मैदान हा मार्ग बंद असेल.