आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Gujarat Police, Solapur, Divya Marathi

मोदींच्या सभास्थळी सुरक्षेचा आढावा, विमानतळ ते होम मैदान मार्ग राहणार बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची बुधवारी दुपारी तीनच्या सुमाराला होम मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची तयारी म्हणून सकाळी अकराच्या सुमाराला गुजरातचे पोलिस पथक, दिल्लीचे सुरक्षा पथक व स्थानिक पोलिस अधिकार्‍यांनी सोमवारी होम मैदानाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. गुजरातचे पोलिस महासंचालक (आयजी) सायंकाळी सोलापुरात आल्यानंतर होम मैदान, विमानतळाची पाहणी करून माहिती जाणून घेतली.
बुधवारी दुपारी साडेबारा ते सभा संपेर्यंत विमानतळ, आसरा, गांधी नगर, सात रस्ता, रंगभवन, होम मैदान हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीला बंद राहणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. पर्यायी मार्गाचा वापर (विजापूर रस्ता, रेल्वे स्टेशन, भय्या चौक बसस्थानक ) करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त अश्विनी सानप यांनी केले आहे. सुरक्षेचा आढावा घेताना पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, उपायुक्त सुभाष बुरसे, पी. आर. पाटील, साहाय्यक आयुक्त खुशालचंद बाहेती, दिलीप चौगुले, निरीक्षक मोहन शिंदे, स्थानिक एटीस पथक आदी उपस्थित होते.
दोन लाख लोक येणार
अँड. शरद बनसोडे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक सभा सोलापुरात होईल. तरुणाईची मोठी गर्दी होईल. सुमारे दोन लाख लोक सभेला उपस्थित असतील, असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. महायुतीचे अँड. शरद बनसोडे यांच्या प्रचारार्थ सभा आहे.