आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Solapur, Divya Marathi, Lok Sabha Election

मोदी लाट की, पुन्हा हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट - शिंदे आणि बनसोडे या दोघांच्या मतांमधील अंतर खूपच कमी होते. परंतु, या वेळी राष्ट्रवादीने काँग्रेसला मनापासून साथ दिली. तर महायुतीमध्ये नेमके उलट झाल्याचे दिसून आले. योग्य समन्वयाअभावी महायुतीतील गट एकत्रित दिसले नाही. त्याचा फटका बनसोडेंना बसू शकतो. त्यामुळे तालुक्यात मोदी लाट चालणार की, पुन्हा शिंदेच बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


बनसोडे यांनीही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या सोलापुरातील सभेनंतर येथील कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला असून, त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु, या गर्दीचा भाजपला किती फायदा होईल हे पाहावे लागेल. तसेच तालुक्यात सुभाष देशमुख यांना माननारा पक्षातील गट प्रचारापासून पूर्णपणे अलिप्त राहिला आहे.
बसपचे संजीव सदाफुले, ‘आप’चे ललित बाबर व भारिपचे गौतम सोनकांबळे यांनी मात्र चांगला प्रचार केला आहे. कॉर्नर बैठका, होम टू होम प्रचारावर त्यांनी भर दिला. पण तालुक्यात या सर्वांची ताकद नगण्यच.


समन्वयाचा अभाव
महायुतीमधील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. संपूर्ण प्रचारात हीच बाब प्रकर्षाने जाणवली. भाजप, शिवसेना व रिपाइं कार्यकर्त्यांमधील समन्वयाअभावी प्रचारात शिथिलताही दिसून आली.


स्थानिकांना आणले एकत्र
सुशीलकुमार शिंदे यांनी शहरामधील सर्व समाजातील नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यासाठी जुन्या राजवाड्यासमोर जाहीर सभाही घेतली. तालुक्यामध्ये कर्नाटकाचे मंत्री एम. बी. पाटील, आमदार ढोबळेंच्या सभा झाल्या.