आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नथुरामवरील नाटकाचा विरोध गुंडाळला, काँग्रेस आंदोलनाने म्हटले "हे राम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सोलापूर - मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाच्या विरोधातील कॉंग्रेसच्या आंदोलनाने बुधवारी "हे राम' म्हटले तर दुसरीकडे खासदार शरद बनसोडे यांनी नाटकाच्या माध्यमातून "नथुराम जागर' केला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी मंगळवारी पोलिसांना निवेदन देऊन नाटकास विरोध दर्शवला होता. पत्रकार परिषदही घेतली होती. बुधवारी त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन घूमजाव केले. नाटकास सेन्सॉर बोर्डाची असलेली मंजुरी आणि संयोजकांनी महात्मा गांधीजींचा अपमान होणार नाही, याची हमी दिल्याचे सांगत विरोध मागे घेत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सावरकर विचार मंचचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी बुधवारी शिवछत्रपती रंगभवनात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा प्रयोग सर्वांसाठी मोफत आयोजित केला होता. दरम्यान, खासदार बनसोडे, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर कांँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटील यांची बैठक झाली. त्यामध्ये नाटकात गांधीजी यांचा अपमान होणार नाही, याची आयोजकांनी लेखी हमी दिली. रंगभवनच्या बाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शरदपोंक्षे यांचे लेखी पत्र
नाटकामध्ये आपेक्षार्ह भावना दुखणावारे कोणतेही वक्तव्य नाही. सेन्सार बोर्डाने ते प्रमाणित केले असून राज्यात त्याचे ७०० प्रयोग झालेत. पण, एकदाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही, असे लेखी पत्र नाटकातील मुख्य कलावंत शरद पोंक्षे यांनी पोलिसांना दिले.

* नाटकाचे आयोजन केलेल्या सावरकर मंचचे जिल्हा संघटक भास्कर चिंता यांनी नाटकामध्ये कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करणार नाही, असे लेखी हमीपत्र पोलिसांना सादर केले.
* पंतप्रधान मोदी यांच्या गांधीप्रेमाचा बुरखा या निमित्ताने फाटला, असा दावा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केला.

काँग्रेसचे पाटील रंगभवनकडे फिरकलेच नाहीत. सावरकर विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी मात्र पाटील यांचा निषेध नोंदवला.
नाटक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने शेकडो प्रेक्षकांना दाटीवाटीने उभे राहून नाटक पाहावे लागले. दुसऱ्या छायाचित्रात नथुराम गोडसे हे गांधीजींची हत्या करत असतानाचा नाटकातील प्रसंग.

गांधी हे देशाच्या विनाशाचे कारण बनत होते. त्यांच्यामुळेच अखंड हिंदुस्थानचे स्वप्न भंगले. म्हण्ूनच केला वध.
हत्या करणे पाप असते तर वध करणे हे कर्तव्य. देशभक्ती ही पाप असेल तर मी पापी भयंकर.
गांधींना काही म्हणायचे असते तर त्यांनी हे रहिम म्हटले असते. कारण त्यांच्या हृदयात राम होते आिण मुखात रहीम होते.
गांधीवधानंतर मी पळालो नाही. स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवता आले असते. मी तसे केलो असतो तर माझी भूमिका जगाला कळलीच नसती.

काँग्रेसने केले घूमजाव
सेन्सॉरबोर्डाने प्रमाणित केलेल्या नाटकाच्या विरोधाचे नेमके कारण पाटील यांना स्पष्ट करता आले नाही. प्रयोग होऊ देणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगणारे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी नाटक सुरू होण्याच्या दीड तास आधीच विरोध मागे घेत असल्याचे सांगितले.