आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटगृहांना राष्ट्रगीताचे होतेय विस्मरण, कारवाईकडे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- चित्रटसुरू होण्याआधी राष्ट्रगीत सादर करावे, असा आदेश सप्टेंबर २००३ मध्ये राज्य सरकारने जारी केला. परंतु शहरातील एक चित्रपटगृह वगळता सर्व चित्रपटगृहांत याचे पालन होत नाही. राज्य सरकारच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.
भागवत परिसरातील बिग सिनेमा चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्याआधी काही मिनिटे राष्ट्रगीत वाजवण्यात येते. अन्यत्र हा नियम पाळत नाहीत. पूर्वी प्रत्येक चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्याआधी आदेशाचे पालन केले जात होते. या आदेशाचे पालन करणाऱ्या चित्रपटगृहांविरुद्ध करमणूक कर विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. आशा चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी आले होते. या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवले गेले नाही.” अनुजामुळे, प्रेक्षक,

कल्पना चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवले नाही.” शिवराजविभुते, प्रेक्षक
मी प्रभात चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी आले होते. यावेळी राष्ट्रगीत वाजवले गेले नाही.” तृप्तीपुजारी, प्रेक्षक
सॅटेलाइटमुळे अडचण
सॅटेलाइटचेजग आहे. चित्रपट सरळ प्रक्षेपित होतात. त्यात दुसऱ्या गोष्टींचा समावेश करावयाचा असेल तर वेगळी मशीन प्रोजेक्टर घ्यावे लागते. त्यामुळे हे मागे पडते. मुळात सरकारने सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राबरोबर राष्ट्रगीत जोडून दिले तर अंमलबजावणी करणे सोपे होईल.” अण्णासाहेबपाटील, अध्यक्ष,चित्रपटगृह मालक संघटना
काही असेल तर पाहतो
असाकाही आदेश आहे याची माहिती नाही. तुम्ही सांगताय तेव्हा कळले. तसे असेल तर नक्की पाहतो. नियम असल्यास कारवाई करू.” एम.बी. भवारे, करमणूक अधिकारी