आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वि.गु. शिवदारे महाविद्यालयात राष्ट्रध्वज संहिता प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सहकारमहर्षी वि. गु. शिवदारे जयंती उत्सवानिमित्त शिवदारे महाविद्यालयात मंगळवारी ‘राष्ट्रध्वज बांधणी प्रशिक्षण’ या विषयावर अभ्यासवर्ग घेण्यात आला. प्रा. डॉ. भास्कर गोडबोले (पुणे) यांनी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजसंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. 1905 पासून भारताच्या ध्वजात स्थित्यंतरे झाली, त्या ध्वजांची माहिती र्शी. गोडबोले यांनी दिली. प्रा. डॉ. बी. एस. कोनापुरे, संतोष गवळी आदी उपस्थित होते.


ध्वजप्रणाम पुस्तकात सविस्तर माहिती
प्रा. डॉ. भास्कर गोडबोले लिखित ‘ध्वजप्रणाम’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात राष्ट्रध्वज संबंधी सर्व सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच सर्व भारतीयांनी वाघा बॉर्डरला जाऊन ध्वजारोहणचे दृश्य आयुष्यात एकदा तरी पहावे, असे आवाहन गोडबोले यांनी केले.

* सूर्योदयनंतर ध्वजरोहण आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवणे.
* ध्वजारोहण करताना त्यात फुलांच्या पाकळ्या इच्छेनुसार ठेवाव्यात.
* ध्वजारोहण कार्यक्रमात प्रथम ध्वजारोहण, सलामी, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा.
* ध्वजस्तंभाची उंची निश्चित नाही.
* सैनिकांच्या मृतदेहावरील ध्वज नंतर नष्ट करणे.
* ध्वज फाटला असेल तर तो नष्ट करणे.
* ध्वजारोहणानंतर दोरीची गाठ मारताना सरगाठ आणि दोन गाठी मारणे
* ध्वजारोहण दररोज करता येऊ शकते.