आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीत गायनातून पेटले देशभक्तीचे स्फुल्लिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्था मुंबईच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेस शनिवारी सोलापुरात प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकसे बढकर एक गीत सादर करून देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटले. पाच गटात ही स्पर्धा होत असून शनिवारी गट १,२ च्या स्पर्धा पार पडल्या. तर रविवारी ३,४,५ गटाच्या स्पर्धा होणार आहेत.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी आत्मार्पण करून ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त राज्यस्तरावर या स्पर्धा घेण्यात येत आहेत. दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. सोलापूर विभागाच्या स्पर्धेचे उद््घाटन प्रसिध्द गायिका सुलभा पिशवीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्पर्धा संयोजिका वर्षा भावे, हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे आणि सविता लळीत आदी उपस्थित होते.
बावीकर, गवळी प्रथम
पहिल्या गटात सार्थक बावीकर याने प्रथम तर अनिशा घाटे हिने व्दितीय क्रमांक पटकाविला. तसेच गट मध्ये वैभव गवळी आणि शंतनु सुरडे ह्यांनी अनुक्रमे प्रथम आणि व्दितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना मनीषा जोशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून तेजस्विनी परांडकर, क्षितिजा जोशी, सोमेश नार्वेकर अंजली भिडे यांनी काम पहिले.
सावरकरांच्या कविता म्हणजे देशभक्ती
यावेळी बोलताना सुलभा पिशवीकर यांनी सावरकरांच्या कविता म्हणजे देशाचे प्रेम आहे असे मत व्यक्त केले. स्पर्धा संयोजिका वर्षा भावे नवीन पिढीत सावरकरांचे विचार रुजावेत, त्यांच्या साहित्याची जाण व्हावी म्हणून या स्पर्धा घेण्यात येत असल्याचे सांगितले. सावरकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने आयोजित देशभक्तिपर गीत स्पर्धेचे उद््घाटन गायिका सुलभा पिशवीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रशांत बडवे भावे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...