आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लस न दिलेल्या बालकांसाठी पुढील तीन दिवस असेल मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने रविवार पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. ग्रामीण भागातील लाख ३१ हजार ०८१ पैकी लाख हजार २८३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. जिल्ह्यातील टक्केवारीचे प्रमाण ९१ टक्के आहे. रविवारी राहिलेल्या मुलांसाठी पुढील तीन दिवस घरी जाऊन लस देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील भडकुंबे यांनी दिली

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील वर्षांच्या आतील एकही बालक पोलिओ लसविना वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्यात आली.

जिल्ह्यात २८१५ लसीकरण केंद्रे स्थापली होती. १२०० आरोग्य कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी आशा कार्यकर्ती तसेच ग्रामसेवक, तलाठी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी इत्यादींच्या प्रयत्नातून ही मोहीम राबविण्यात आली . प्रवासातील बालकांसाठी एस. टी. स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, वीटभट्ट्या, साखर कारखाने परिसर, ऊसतोड मजुरांची पाले सार्वजनिक ठिकाणी लस देण्यात आली . आरोग्य अधिकारी जि. प. २२५१ लसीकरण केंद्र (ग्रामीण),३५५ लसीकरण केंद्र (सोलापूर), १७८ फिरते पथक (ग्रामीण), १८९ फिरते पथक (न.प. सोलापूर मनपा), फिरते पथक (रात्रीचे), लाख मुलांच्या लसीकरणाची अपेक्षा, वर्षांखालील एकही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील होते.

शहरात ८२ हजार जणांना डोस
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतून रविवारी शहरात ८२ हजार ७१४ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली. महापौर सुशीला आबुटे आणि आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते त्यास सुरुवात झाली. शहरात एकूण ३०३ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. १८ फिरते मोबाइल आणि २५ ट्रान्झिट टीम अशी यंत्रणा राबवण्यात आली. एसटी स्थानक, रेल्वे स्थानक आदी केंद्रातून दिवसभरात ८२ हजार बालकांना मात्रा देण्यात आली. आता २२ फेब्रुवारीला पुन्हा एकदा मोहीम राबवण्यात येणार आहे.