आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुभाजक सुशोभीकरणाचे आदर्श कार्य, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दिले योगदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रस्तादुभाजकांची अवस्था कचराकुंडीसारखी होत असलेली पाहून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी विजापूर रस्त्यावरील ५०० मीटरचा दुभाजक सुशोभित करण्याचे कार्य हाती घेतले आहे. विविध दुभाजक सजवण्याच्या कार्यासाठी जनसहभाग अवश्यक आहे. त्यामुळेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायक आहे, असे मत शाहीर रमेश ख्याडे यांनी व्यक्त केले.
एनएसएस विभाग आणि रोटरी क्लब आॅफ नॉर्थ यांचा संयुक्त उपक्रम असल्याचे आयटीआयचे एनएसएस विभागप्रमुख एम.एम. बीडकर यांनी सांिगतले. आयटीआय पोलिस चौकी ते अशोक नगर हा दुभाजक शोभेच्या वृक्षांनी लवकरच नटेल. सध्या कण्हेरी रोपे लावून दुभाजकाचे रूपडे पालटवले जात आहे.

आयटीआय एनएसएस विभागातील २०० विद्यार्थी मिळून तीन वर्षांसाठी हा दुभाजक सजवणार आहेत. येथील हिरवाई नटलेली दिसून येईल. सध्या रोपे लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. दररोज नेटकी काळजी घेऊन हा दुभाजक आदर्श वाटेल असा फुलवण्यात आम्ही लवकरच यशस्वी होऊ.” मनोजबीडकर, एनएसएसविभाग प्रमुख, आयटीआय