आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात होणार एनटीपीसीची जलवाहिनी,एनटीपीसीचा 39 वा वर्धापनदिन उत्साहात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एनटीपीसी प्रकल्पातून सोलापूर शहरासाठी आणि प्रकल्पासाठी उजनी धरणातून पाइपलाइनद्वारे पाणी आणले जाणार आहे. ११० किलोमीटरचे हे काम असून ते नोव्हेंबर २०१५ मध्ये पूर्ण केले जाणार असल्याचे प्रकल्पाचे सरव्यवस्थापक एन. एन. राय यांनी शुक्रवारी दिली.
नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन (एनटीपीसी) या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वीज निर्मिती करणाऱ्या शासकीय कंपनीने शुक्रवारी ३९ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त सोलापूरच्या प्रकल्पस्थळी हवेत फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

त्यानिमित्त राय यांनी सांगितले की, उजनी ते एनटीपीसी, सोलापूर हा प्रकल्पातील पाण्याचे काम सर्वात मोठे असून, प्रकल्पस्थळापर्यंतचे काम पूर्ण करण्याचे जिकिरीचे काम आहे. ते आमचे अधिकारी, कर्मचारी पूर्णत्वाला नेत आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये ते पूर्ण केले जाईल.
कंपनीतर्फे कोळसा, गॅस सोलार वीज निर्मिती केली जाते. एकूण ४३ हजार १२८ मेगावॅट विजेची सध्याची क्षमता आहे, अशी माहितीही राय यांनी दिली.
या कार्यक्रमाला सर्व कर्मचारी, अधिकारी सहकुटुंब उपस्थित होते. या वेळी जीएम ट्रॉफी सिव्हिल कन्स्ट्रक्शन विभागाला देण्यात आली. तर एक्सलन्स परफॉर्मचा अवॉर्ड फायनान्स आणि अकाउंट विभागाला देण्यात आला.
1975 ला स्थापना
एनटीपीसीही 1975 मध्ये स्थापन झालेली कंपनी असून, 1976 मध्ये पहिला वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला होता. 1982, 1983 पासून वीजपुरवठा सुरू केला होता. तो पहिला प्रकल्प 500 मेगा वॉट युनिटचा होता.