आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सोमवारी होणार मेळावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन विधानसभेतील पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर हुतात्मा स्मृती मंदिर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी दिली. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहिते, आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार रमेश कदम, हनुमंत डोळस, जि.प. अध्यक्षा जयमाला गायकवाड आदींची उपस्थिती राहणार आहे.

वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम मेळाव्याचे नियोजन या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या मेळाव्यास अधिकाधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्यासंबंधी तालुकाध्यक्षांना सूचना देण्यात आल्या. शिवाय पक्षाची संघटनशक्ती वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. यावेळी जि.प. अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी अध्यक्ष मनोहर डोंगरे, सभापती बाबाराजे देशमुख, कल्पना निकंबे, पंडीत वाघ आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...