आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - गेल्या अनेक दिवसांपासून शहर उत्तर विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्याची शहरातील कार्यकर्त्यांची मागणी असून ती जागा राष्ट्रवादीला सोडावी, असा आग्रह शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी अध्यक्ष महेश गादेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत धरण्यात आलेला आहे.
26 ऑक्टोबर रोजी महाबळेश्वर येथे पक्षाचा मेळावा होत असून यानिमित्त शहरातील पदाधिकार्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीस उपमहापौर हारून सय्यद, कय्युम बुर्हाण, गटनेते दिलीप कोल्हे, शंकर पाटील, मनोहर सपाटे, विजय फुटाणे, अरुण वर्मा, वैशाली गुंड, सायली शेंडगे, राहुल इंदापुरे आदी उपस्थित होते. शहरात राष्ट्रवादीची आणखी ताकद वाढवण्यासाठी विधानसभेची एक जागा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शहर उत्तरची जागा पक्षाला मिळावी, यासाठी आपण सर्व पदाधिकार्यांनी महाबळेश्वर येथील मेळाव्यात आग्रही राहण्याचे आवाहन केले.
शहरात राष्ट्रवादी ताकद वाढवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरची जागा सोडावी, अशी मागणी पक्षप्रमुखांकडे करण्याचा निर्धार दिलीप कोल्हे, मनोहर सपाटे, शंकर पाटील, अरुणा वर्मा यांनी आपल्या भाषणात केला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी अजिंक्यतारा साखर कारखान्यावर राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.