आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Natya Parishad Election Mohan Joshi Blame On Vinay Apte

विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्या - मोहन जोशींचा आरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - साहित्य संमेलनाचे सुप वाजले आणि त्यानिमीत्ताने सुरु झालेले सर्व वाद संपूष्टात आले. आता नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरुन आजी - माजी अध्यक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

नाट्य परिषदेचे अध्यक्ष विनय आपटे यांनी बोगस मतपत्रिका छापल्याचा आरोप माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे. मतपत्रिका या मुंबईत छापल्या पाहिजे असे सांगत ते म्हणाले, आपटेंनी मतपत्रिका या नाशिकमध्ये छापल्या आणि तिथेच त्या पाकिटबंद केल्या. परिषदेच्या नियमानुसार त्या मुंबईत छापणे आवश्यक आहे आणि मुंबईतच त्या पाकिटात टाकल्या पाहिजे. नाट्य परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूकीत जे काही सुरु आहे ते सहनशक्तीच्या पलिकडे झाल्यामुळे आता बोलावे लागत असल्याचे ते म्हणाले.

(फोटोला क्लिक करुन वाचा, मोहन जोशींचे आरोप बिनबुडाचे- विनय आपटे)