आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Natyasammelan Ending : Next Natyasammelan Will Be Take In Belgaum

नाट्यसंमेलनाचा समारोप: पुढचे नाट्यसंमेलन बेळगावात घ्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शं.ना.नवरे नाट्यनगरी, पंढरपूर - सीमावर्ती भागातील मराठी माणसाला बळ देण्यासाठी अशी संमेलने राज्याबाहेरही व्हावीत, अशी अपेक्षा राज्याचे विधी व न्यायमंत्री उदय सामंत यांनी येथे व्यक्त केली. पुढचे नाट्यसंमेलन बेळगावात घ्यावे, अशी सूचना त्यांनी नाट्य परिषदेला केली. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री दिलीप सोपल, माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी या सूचनेचे स्वागत केले.
पंढरपुरातील 94 व्या नाट्यसंमेलनाचा रविवारी दिमाखात समारोप झाला. समारोपासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार येणार होते, पण त्यांचा दौरा रद्द झाला. मात्र, समारोप सोहळ्यासाठी त्यांचे समर्थक मंत्री आणि आमदार मंडळी उपस्थित होती. उद्घाटन सत्रात काँग्रेसचे नेते, तर समारोपात राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र दिसून आले.
सामंत यांनी सीमावर्ती भागातील मराठी माणूस बळकट करण्याची भूमिका मांडली. कन्नडिगांचा सामना करण्यासाठी बेळगावात तळ ठोकून बसू, असेही ते म्हणाले. स्वागताध्यक्ष आमदार भारत भालके यांनी प्रास्ताविक केले. मोहन जोशी यांनी आभार मानले. या वेळी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, दीपक साळुंके, परिषदेचे मुख्य कार्यवाह दीपक करंजीकर, संयोजक दिलीप कोरके, भाऊसाहेब भोईर, सागर यादव, नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव आदी उपस्थित होते.
अभिजात दर्जा का नाही?
बाराशे, पंधराशे वर्षे जुन्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. त्याहून जुन्या मराठी भाषेला हा दर्जा का मिळत नाही? संसदेतील महाराष्ट्राच्या खासदारांनी याबाबत पंतप्रधानांची भेट घ्यावी.
-उदय सामंत, विधी व न्यायमंत्री
मराठी समृद्ध भाषा
बेळगाव ते तंजावरपर्यंत बोलल्या जाणा-या मराठीने साहित्य व नाट्यकला समृद्ध केली आहे. हा झेंडा सर्वदूर पोहोचण्यासाठी शासन मदत करण्यास तयार आहे.
-सुनील तटकरे, जलसंपदामंत्री
भुजबळांना पाठवा
बेळगावात जेव्हा संमेलन घेऊ तेव्हा भुजबळांना तिथे पहिल्यांदा पाठवू. कारण कन्नडिगा काय आहेत, हे भुजबळांना माहीत आहे.
-दिलीप सोपल, पाणीपुरवठामंत्री
अधिवेशनात १६ ठराव; मराठी नाटकांच्या बसला नकोय टोल -
मराठी रंगभूमी सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. त्यामुळे शासनाने मराठी नाटकांच्या बसला टोलमुक्त करावे, यासह 16 ठराव 94 व्या नाट्य संमेलनात मंजूर झाले. प्रथम शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर रंगकर्मींच्या अभिनंदनाचा ठराव झाला. इतर ठराव असे होते.
1. नाट्य परिषदेला नाट्य कला अकादमी सुरू करायची आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी 5 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. पण शासनाने 5 एकर जमीन द्यावी.
2. रत्नागिरीत झालेल्या 91 व्या संमेलनात कलावंतांना घरे देण्याची घोषणा झाली. पुढे काहीच झालेले नाही. त्यासाठी जमीन मंजूर करून परिषदेला द्यावी.
3. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने जुन्या नाटकांचे डीआरएम क्रमांक जिल्हाधिका-यांनी नाट्य संस्थांना द्यावेत.
4. शासनाच्या नाट्य स्पर्धा समन्वयासाठी संबंधित नाट्य परिषदांच्या पदाधिका-यांना संधी व जबाबदारी सोपवावी.
5. नाटकांना अनुदान देणा-या समितीवर नाट्य परिषदेचा अध्यक्ष आणि कार्यवाह यांना संधी द्यावी.
6. व्यावसायिक नाटकांप्रमाणे बालरंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी व्यावसायिक बालनाटकांना अनुदान द्यावे.
7. सांस्कृतिक धोरणांची अंमलबजावणी करावी.
8. राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील संघास खर्चापोटी कमीत कमी 25 हजार रुपये द्यावेत.
9. रेल्वे मंत्रालय कलावंतांसाठी 25 टक्के सवलत देते. त्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाने प्रयत्न करावेत.
10. नाट्यगृहे साकारण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेस मध्यवर्ती शाखेने मागणी शासनाने करावी.