आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसामुळे बाजारामध्ये धांदल, आज घरोघरी बसणार घट, अंबाबाईच्या जागराला झाली सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- घटस्थापनेला लागणा-या साहित्यांच्या खरेदीसाठी महिलांची बुधवारी सायंकाळी मोठीच लगबग होती. मधला मारुती, टिळक चौक, बाळीवेस, जोडबसवण्णा, विजापूर रस्ता, आसरा, अशोक चौक, घोंगडे वस्ती, मरिआई चौक, स्टेशन मार्केट, कस्तुरबा मार्केट, लक्ष्मी मंडई या ठिकाणी बाजार फुलला. काळी माती, पानांची पत्रावळ, संमिश्र धान्य, लोटगे, माळांसाठी पूजेची पाने, फुले, तोरणाला आंब्यांची पाने, पाच फळे, भोपळा याच्या खरेदीला मोठी गर्दी होती. परंतु, दुपारनंतर आलेल्या पावसाने विक्रेते अन् खरेदीसाठी आलेल्या महिलांची मोठीच धांदल उडाली.
घटातील धान्याची चांगली उगवण व्हावी यासाठी पत्रावळी ठेवण्याची प्रथा आहे. गेल्या काही वर्षांपासून पत्रावळीऐवजी प्लास्टिकचा वापर सुरू होता. परंतु, यंदा मात्र महिलांनी प्लास्टिकऐवजी पुन्हा पत्रावळीलाच प्राधान्य दिल्याचे िदसून आले. पर्यावरणाचा विचार करून पत्रावळी तसेच स्टील आदी धातूचे कोणतेही ताट वापरणार असल्याचेही अनेक महिलांनी आवर्जून सांगितले.