आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ समाजाचा आधार - पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ज्येष्ठांकडे आचार-विचार व संस्कृतीची शिदोरी आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजाचा आधार आहेत. त्यांच्या या शिदोरीचा तरुणांनी वैचारिक उन्नतीसाठी उपयोग करून घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी सोमवारी केले.

निर्मलकुमार फडकुले सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होती, त्यावेळी पालकमंत्री ढोबळे बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, प्रदेश निरीक्षक जगन्नाथ शेवाळे, उपमहापौर हारून सय्यद, माजी महापौर युनूस शेख आदी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठांसाठी भावगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

ढोबळे म्हणाले, ‘जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जे आयुष्यभर मुलांचे आयुष्य उभे करण्यासाठी धडपडतात, त्या ज्येष्ठांना आर्शमात ठेवण्याच्या घटना घडत आहेत. आजच्या युगात जगण्याचे संदर्भ बदलले आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. आपल्या मुलांना अंगाखांद्यावर वाढवून त्यांच्या यशासाठी कष्ट सोसतात. मुले मात्र मोठी झाली की त्यांना थेट वृद्धार्शमाचा रस्ता दाखवतात. या सगळ्या घटना विरोधाभास निर्माण करणार्‍या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने याचा विचार करून एक संगीत मेजवानी देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

मांडी घालून केले भाषण
पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी ज्येष्ठांचा आदर ठेवत मांडी घालून भाषण केले. ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे म्हणून इथपर्यंत आलो आहे. त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहावा. ज्येष्ठांचा आदर राखण्यासाठी पालकमंत्र्यांनी मांडी घालून भाषण केले.

या ज्येष्ठांचा विशेष सत्कार
माजी महापौर नारायण राठी, माजी उपमहापौर नारायणदास कोनापुरे, माजी परिवहन समिती सभापती राजाराम भंडारे व भाऊसाहेब भेनुरे-सुलोचना भेनुरे यांचा सत्कार ढोबळे यांच्या हस्ते झाला. र्शी. ढोबळेंनी ज्येष्ठांचा सत्कार त्यांच्या जागेवर जाऊन केला.

ज्येष्ठ रंगले भावगीतात
वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी भावगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व ज्येष्ठ मंडळी रंगली होती.