आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपने पाडले भगदाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ- मोहोळ तालुक्यातील 100 गावांपैकी 75 गावांत भारतीय जनता पक्षाने मताधिक्य मिळवत वर्षानुवष्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. काँग्रेसला फक्त 25 गावांत आघाडी मिळवता आली. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे व आमदार लक्ष्मण ढोबळे यांची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादीचे पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या गटांवर तसेच अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.
मोहोळ विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व माजी स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री आमदार लक्ष्मण ढोबळे करतात. मात्र, या मतदार संघात भाजपचे उमेदवार शरद बनसोडे यांना 13,442 मतांची आघाडी मिळाली. तालुक्यातील मतदारांनी सत्ताधार्‍यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत बनसोडे यांना पसंती दिली. गत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना तालुक्यातून 35,692 मतांची आघाडी मिळाली होती.

माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गटातून शिंदे यांना 5,643 मताधिक्य मिळाले. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या शेटफळ गटातून 2,100 मतांची आघाडी शिंदे यांना मिळाली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना भाजपसोबत आघाडी करत भीमा परिवाराच्या माध्यमातून कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामध्ये राजन पाटील गटाचा पराभव झाला होता. परंतु कारखान्यावरील सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी लोकसभेच्या प्रचारात गावोगावी एकत्र फिरत होती.

मोहोळ तालुक्यात सात जिल्हा परिषद गट तर 14 पंचायत समिती गट आहेत. पंचायत समितीत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे सात सदस्य आहेत. नरखेड जिल्हा परिषद गटाच्या सेनेच्या सदस्या शुभांगी करणवार यांनी बनसोडे यांना गटातून तब्बल 4000 मतांची आघाडी दिली. मागील निवडणुकीत नरखेड गटातून शिंदे यांना 3600 चा लिड मिळाले होते. राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या अतंर्गत कुरघोड्यांच्या फायदा भाजपला झाला. मोहोळ जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून बनसोडे यांना 1326 चे लिड मिळाला. पशुसंवर्धन व कृ़षी सभापती जालिंदर लांडे यांच्या कुरूल गावातून 1512 मते, भाजपचे संतोष पाटील यांच्या नरखेड गावातून भाजपला 361 मते मिळाली. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे यांच्या पेनूर गावातून भाजपला 1216 मते मिळाली. महाआघाडीत सामील झालेल्या जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या पाटकूल भागातून 1000 मतांचे मताधिक्य भाजपला मिळाले.