आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’ने जाहीर केली सदस्यांची जात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राजकारणासाठी आणि पक्षबांधणीसाठी बहुतांश राजकीय पक्ष जातीचा विचार करतात हे जगजाहीर आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘शहर उत्तर विधानसभा’ विभाग आणि ‘बी’ व ‘ए ब्लॉक’ची कार्यकारिणी जाहीर केली आहे. प्रसारमाध्यमांना पदाधिकर्‍यांची यादी देतानाही चक्क जातनिहाय पदाधिकार्‍यांची नावे जाहीर केली आहेत.

जातीची समीकरणे लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात. पण ते प्रत्यक्षपणे. अधोरेखित होणार नाही, याचीही काळजी घेतली जात होती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने उघडपणे जातनिहाय ‘शहर उत्तर’ची कार्यकारिणी जाहीर केली आहे. विभागाचे अध्यक्ष म्हणून भीमाशंकर उर्फ संजय जाबा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नावासमोर अध्यक्षपद असे नमूद करीत असतानाच पुढच्या कॉलममध्ये प्रभाग क्रमांक आणि त्या पुढच्या कॉलममध्ये त्यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. इतर सर्व पदाधिकारी या प्रमाणेच जाहीर केले आहेत. त्या सर्वांच्या नावांसमोर जातींचे उल्लेख आहेत. ‘ए ब्लॉक’ची कार्यकारिणीही तशीच आहे. त्याच्या उपाध्यक्षपदी निशांत कलशेट्टी यांच्यापासून इतर पदाधिकारी अध्यक्ष मल्लेश बडगू यांनी जाहीर केले आहेत. बी ब्लॉकच्या अध्यक्षपदी प्रवीण सोनवणे यांची निवड झाली आहे. तिन्ही कार्यकारिणीची घोषणा सरचिटणीस दिनेश शिंदे यांनी केली आहे.

‘ए ब्लॉक’ची कार्यकारिणी
अध्यक्ष : मल्लेश बडगू, उपाध्यक्ष : निशांत कलशेट्टी, चंदन लोमटे, सरचिटणीस : राजकुमार बंडगर, अहमद मासूलदार, चिटणीस : संजय भोसले, प्रशांत बडगेरी, आकाश जमादार, कोशाध्यक्ष : देविदास हिबारे, कार्यकारिणी सदस्य : प्रभाकर सग्गम, बालाजी कुडक्याल, गणेश गव्हाणे.

‘बी’ ब्लॉकची कार्यकारिणी
अध्यक्ष : प्रवीण सत्यवान सोनवणे, उपाध्यक्ष : सोपान खांडेकर, चंद्रविलास गायकवाड, सरचिटणीस : मुकुंद सुरवसे, महेंद्र वाडेकर, चिटणीस : अमोल इरकल, विकास शिंदे, कोशाध्यक्ष :अभय भोसले, कार्यकारिणी सदस्य : कैलास चव्हाण, विजय पानकुतवार, शौकत आत्तार, योगेश हदरे.