आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरात ‘राष्ट्रवादी’ची सदस्य नोंदणी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- केंद्रातभाजपचे एकहाती सरकार असूनही गरिबांची कामे करत नाही. मोदी यांनी निवडणुकीत अनेक अाश्वासने दिली, पण एकाचेही पालन केले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब शेळके यांनी शुक्रवारी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवीन सभासद नोंदणी मोहिमेस श्री. शेळके यांच्या हस्ते सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. शेळके म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सर्वसामान्य वर्गातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. केंद्र राज्य दोन्ही सरकारने घोर निराशा केली आहे.
शहराध्यक्ष मनोहर सपाटे, माजी अध्यक्ष कय्युम बुऱ्हाण, उपमहापौर प्रवीण डोंगरे, परिवहन समितीचे सभापती आनंद मुस्तारे, विजयकुमार हत्तुरे, अनिल नागणे आदींनीही सरकारवर टीका केली. या वेळी सुभाष साळुंखे, मनीषा नलावडे, अरुणा वर्मा, महेश निकंबे, जावेद खैरदी, महेश माने, राजेंद्र आवताडे, ज्ञानेश्वर सपाटे, हरिदास गायकवाड, लक्ष्मण जगताप, अनिल नागणे, मुकुंद जाधव, दत्ता भोसले, दीपक डुरे पाटील, विलास झरेकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रशांत वायसकर यांनी केले. नवनाथ भजनाळे यांनी आभार मानले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहीम सुरू करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीस बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी मनोहर सपाटे, कय्युम बुऱ्हाण, जावेद खैरदी, महेश माने आदी.