आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे आमदार कदमांची जीभ घसरली, जिल्‍हाधिकाऱ्यांबद्दल अपशब्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - "जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे मनोरुग्ण तर एसपी (पोलिस अधीक्षक) हे मूर्ख आहेत,'' अशी मुक्ताफळे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी गुरुवारी उधळली. पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात "आधी रस्ते मग वाळू' धोरण राबवावे या मागणीसाठी आमदार कदम हे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत त्यांची जीभ घसरली.

आमदार रमेश कदम म्हणाले, ‘मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील खराब रस्त्यांना वाळूमाफिया जबाबदार आहेत. ते नियमांपेक्षा जास्त मालवाहतूक करतात. त्यामुळे रस्ते खराब होत आहेत. लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यातून मुक्तता करण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत.’

जिल्हाधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख
जिल्हाधिकाऱ्यांचाएकेरी उल्लेख करून कदम म्हणाले, तो मनोरुग्ण आहे. त्यांना नीट काम करता येत नसल्याने त्याला लोक हाकलून लावतात. पंढरपुरातही अतिक्रमण कारवाई करताना मोठ्यांना हात लावण्याची हिंमत तो दाखवत नाही.’ जिल्हाधिकारी मुंढे यांच्यावर अॅट्रॉिसटी अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले.

तहसीलदार दारू पिऊन येतात...
आमदारकदम यांनी इतर अधिकाऱ्यांवरही तोंडसुख घेतले. ते म्हणाले, ‘वाळूच्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी येणारे तहसीलदारच दारू पिऊन येतात. मी शासनाच्या कामात मदत करीत असताना माझ्यावर विनाकारण सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.’

जिल्हाधिकाऱ्यांकडेजायला सांगतो
पोलिसांनीवाळूमाफियांवर कारवाई करावी म्हणून मी एसपींना सांगितले. त्यावर त्या मूर्खाने ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी, असे सांगितले. तहसीलदारांचा ड्रायव्हरच वाळूमाफिया आहे, असा आरोपही कदम यांनी केला. मात्र नाव सांगितले नाही. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरही घसरले.