आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार कदमांचे बेलगाम कक्‍तव्‍य , अजित पवारांच्‍या भाषणाची पुनरावृत्‍ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उजनीच्या प्रश्नावर वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनी शुक्रवारी मुक्ताफळे उधळली. बेताल वक्तव्यांनी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक महसूलमधील अधिकाऱ्यांवर अश्लील भाषेत तोंडसुख घेतले. त्यांची ही आगळी-वेगळी दबंगशाही पोलिसांनी रेकॉर्डिंग करून घेतली खरी, पण कारवाई मात्र काहीच केली नाही. उलट कदम यांनीच पंढरपूर न्यायालयात हजेरी लावून जामीन करून घेतला. त्यांच्या या एकूणच प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.

आधी रस्ते मगच वाळू उपसा या मागणीसाठी आमदार कदम यांनी शुक्रवारी मरिआई चौकातून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व स्वत: आमदार कदम यांनी केले. भय्या चौक, पार्क चौक, डफरिन चौक, हरिभाई देवकरण प्रशालेमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. आमदार कदम यांनी मोर्चाच्या सुरुवातीपासून ते भाषण संपेपर्यंत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना मेन्टल तर पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना भांडीघाशा अशा शब्दांचा पुनरुच्चार केला.

आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्ष विद्या शिंदे, जि. प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, दिलीप देवकुळे, विराज पाटील, बाबासाहेब पाटील आदी सहभागी झाले.

कर्मचारी गप्पच
जिल्हा परिषदेतील एकही कर्मचारी संघटना पुढे आली नाही. झेडपीच्या मुख्य प्रवेशदारामसोर सीईओंबाबत झालेल्या अश्लील शेरेबाजीचा साधा निषेधही व्यक्त करण्याचे धाडस संघटनांनी दाखवले नाही.

माध्यमांशी म्हणाले...
३०वर्षांपासून गावकरी वाळू माफियांच्या दहशतीमुळे घाबरले आहेत. त्यांना जिल्हाधिकारी मुंढे यांनी पाठीशी घातले आहे. पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरचे नोकर बनले आहेत, असे कदम म्हणाले.

सीईओंवरही आमदार कदम घसरले
मोहोळशहर परिसरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण हटवल्याप्रकरणी आमदार कदम यांनी जि.प.चे सीईओ सुरेश काकाणी यांच्याबद्दल जाहीर सभेत अश्लील शेरेबाजी केली. गरिबांच्या झोपड्या पाडताना लाजा कशा वाटत नाही, जिल्ह्यात नोकरशाही माजली आहे. झोपड्या पाडण्याऐवजी धनदांडग्यांच्या इमारती पाडा, असे म्हणत त्यांनी जिल्हाधिकारी मुंढे सीईओ काकाणींबाबत असंसदीय भाषा वापरली.

िचथावणीखोर भाषण...
आमदारकदम दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष दिलीप देवकुळे यांनी प्रक्षोभक भाषण केले. देवकुळे यांनी जिल्हाधिकारी गावात आल्यास त्यांच्यावर दगडफेक करा, मुंढे नावाचं माकड असे शब्द वापरले तर आमदार कदम यांनी अश्लील भाषेमध्ये टीका केली.

या शिव्यांचा सर्रास वापर
आमदार कदम यांनी भाषणामध्ये तहसीलदार, प्रांताधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना अश्लील भाषा वापरली. जिल्हाधिकारी यांना मेंटल, पागल, गाढव, हरामखोर यापेक्षा आणखी असंसदीय अर्वाच्य भाषेचा वापर केला.

पुन्हा माझ्याशी गाठ आहे
पोलिसांनीजिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला अटक होईल, काही दिवस जेलमध्ये राहीन. यामध्ये फाशी तर होणार नाही, मात्र ज्यावेळी मला जामीन होईल, त्यावेळी ज्यांनी गुन्हा दाखल केला आहे, त्याची गाठ माझ्याशी राहणार आहे.

जमावाने पोलिसांना दाखवली चप्पल
कदमयांनी भाषणात जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांचे वाळू माफियांशी लागेबांधे आहेत. पोलिसांकडून ठेकेदारांना संरक्षण दिल्यास पोलिसांना गावात येणे मुश्किल करा, त्यांना चपलेने मारा असे सांगत, आता प्राथमिक स्वरूपात पोलिसांना चपला दाखवा असे सांगताच उपस्थित महिलांनी पोलिसांना चपला दाखवल्या.
जिल्ह्यातून तडिपार करण्यात आलेले वाळू माफिया जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात.
वाळू माफियांना संरक्षण देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. अधिकाऱ्यांची सीआयडीमार्फत चौकशी करावी.
जिल्हाधिकाऱ्यांचा मोबाइल ट्रॅकर तपासा. पंढरपूर पोलिसांना ५० फोन करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले.
दोषी आढळल्यास आमदारकीचा राजीनामा देईन. कारवाई सिद्ध झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:स मनोरुग्ण जाहीर करावे.

अधिकाऱ्यांनाच दिले कदम यांनी आव्हान

आमदारांशी चर्चा करू
-मोहोळच्याआमदारांकडून वाळू उपसाप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांवरील केलेली वक्तव्ये चुकीची आहेत. स्थानिक अधिकारी यांच्याकडून प्रश्न सुटला नाही तर संबंधित वरिष्ठांकडे तक्रार करावी. अधिकारीविरोधी बेताल वक्तव्य त्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार आहे. विजयकुमारदेशमुख, पालकमंत्री.

धोरणबदलून आणावे
-शासनाच्यानिर्णयानुसार आम्ही वाळू लिलाव करत आहोत. आमदारांची आधी रस्ते मगच वाळू लिलाव अशी मागणी असेल तरी त्यांनी धोरण बदलून आणावे, आम्ही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करू. तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी

आंदोलन योग्यच
-आमदारकदम यांचे आंदोलन योग्यच. अधिकारी लोकप्रतिनिधींना जुमानतच नाही. संताप व्यक्त करण्यासाठीच कदम रस्त्यावर उतरले. अश्लील शिवीगाळ नको होती. बळिरामसाठे, माजीअध्यक्ष, जिल्हा परिषद