आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नथुराम गोडसे उदात्तीकरणाचा राष्ट्रवादीकडून निषेध, स्टेशन चौकातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे त्यांच्या विचाराचे उदात्तीकरण करणाऱ्या अपप्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मूक आंदोलन केले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, शहराध्यक्ष मनोहर सपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नथुराम गोडसे त्यांच्या विचाराचे उदात्तीकरण करणाऱ्या अपप्रवृत्ती देशात वाढत आहेत. उदात्तीकरणास पायबंद घालण्यासाठी आंदोलन असल्याचे शहराध्यक्ष मनोहर सपाटे म्हणाले. माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी जि. प. अध्यक्ष बळीराम साठे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, दिलीप कोल्हे, रामेश्वर मासाळ, मानाजी माने, बसवराज बगले, सिकंदर गोलंदाज, शंकर पाटील, चंद्रकांत पाटील, आनंद मुस्तारे, विद्या शिंदे, सुनीता कारंडे, रेखा सपाटे, पीरअहमद शेख यावेळी उपस्थित होते.