आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळसूत्र चोरास पकडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सात रस्ताजवळ संगमेश्वर महाविद्यालयालगत रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावताना तरुणाला नागरिकांनी पकडले. सुधीर रमेश गायकवाड (वय 22, रा. संजय नगर कुमठा नाका) याला अटक झाली. न्यायालयाने त्याला 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली. त्याचे आणखी दोन साथीदार पळून गेले. मंगल अरुण मडरे (रा. मसिहा चौक, मोदी) यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. र्शीमती मडरे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला कामाला जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी तिघांनी गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. आरडाओरड करताच नागरिकांनी तिघा चोरांचा पाठलाग केला. सिटी बस डेपोजवळ सुधीर हाती लागला. अन्य दोघे पळून गेले. सदर बझार पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला पकडून नेले.

पैसे हिसकवणार्‍यास अटक
आयटीआय पोलिस चौकीजवळ कलिंगड खरेदी करताना धक्काबुक्की करून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी सायंकाळी सात वाजता अशोक हंबरडे कलिंगड घेत होते. तिघा तरुणांनी त्यांना धक्काबुक्की करून खिशातील पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. रोहित गणेशा भोईवडार (वय 19, रा. अनगल, कर्नाटक) याला पकडले. दोघेजण पळून गेले. हंबरडे यांनी आरड-ओरड करताच रोहितला नागरिकांनी पकडले. पोलिसांना घटना कळताच घटनास्थळी आले. संशयितजवळ पाच मोबाइल सापडले.