आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडफोड करून काय फायदा?टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसवा : नितेश राणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राज्यातील टोल नाक्यांवर तोडफोड करून काहीच फायदा नसल्याचे मत व्यक्त करत स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष व उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी बुधवारी मनसेच्या आंदोलनावर अप्रत्यक्ष टीका केली. त्याऐवजी वाहनांचा अभ्यास करून या नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
स्वाभिमान संघटनेच्या मेळाव्यानिमित्त सोलापुरात आलेल्या राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.शिवशाही मिलमधील कामगारांच्या वेतनवाढ कराराविषयी राणे म्हणाले की, शिवशाही मालक व कामगार प्रामाणिक असून त्यांची करार करण्याची इच्छा होती. मात्र, युनियनवाल्यांनी टोकाची भूमिका घेतल्याने करार होत नव्हता. वेतनवाढीचा सकारात्मक करार मुंबईत झाला. उपलब्ध नोकºया तरुणांसमोर आणणे आमच्या संघटनेचे प्रमुख काम आहे.
राहुल गांधी लवकरच मंत्रिमंडळात असतील- राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होतील आणि राहुल गांधींना मंत्रिमंडळात स्थान मिळेल. राहुल गांधींकडून मंत्रिपदाचा स्वीकार होईल, असेही नितेश राणे यांनी सांगितले.
महिलांसाठी सुप्रिया सुळेंचा उपक्रम स्तुत्य- राष्ट्रवादी युवती अभियानाचा खासदार सुप्रिया सुळे यांचा उपक्रम स्तुत्य आहे. पन्नास टक्के महिला आरक्षणानंतर राजकारणात महिलांची संख्या अपुरी आहे. त्यांचा उपक्रम चांगला असून त्यांच्याकडून उपक्रमात काही राहिले तर मी पूर्ण करेन, असेही नितेश यांनी सांगितले.