आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्कासाठी ओबीसींची जनगणना आवश्यक- प्रा. हरी नरके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 मध्येच इतर मागासांची गणना करण्याची सूचना केली होती. त्यानंतर 53 मध्ये कालेलकर आणि 78 मध्ये मंडल आयोगानेही तशा सूचना दिल्या. परंतु अद्यापही ही गणना झालेली नाही. त्यामुळे ओबीसींना त्यांच्या हक्काचा वाटा मिळत नाही, असे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरी नरके (पुणे) यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाप्रमुख आबासाहेब खोत अध्यक्षस्थानी होते. सोलापूर शहराध्यक्ष उस्मान बागवान, भारत गारमेंटचे अध्यक्ष शफी इनामदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. नरके पुढे म्हणाले, ‘देशात 12 धर्मांची माणसे आहेत. प्रत्येक धर्मातील खालच्या वर्गात कष्टकरी असून, त्याच्या हातात जादू आहे. त्या कलेने तो जगत असतो. धर्म सांभाळत असतो. धर्म कितीही प्रिय असला तरी त्याने सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीचा विचार केला पाहिजे. ओबीसी नेमके तेच करत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे सार्‍यांचे दुर्लक्ष आहे. त्यांचीच संख्या त्यांना माहीत नसल्याने न्यायव्यवस्थाही त्यांना न्याय देऊ शकत नाही. ओबीसींची संख्या स्पष्ट होण्यासाठी जनगणना महत्त्वाची आहे. त्यासाठी ओबीसी जागे झाले पाहिजे. अन्यथा पुढील दोनशे वर्षांतही त्यांची गणना होणार नाही.’ अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...