आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Need To Vegetable Market Issue At Solapur, News In Marathi

थेट पालेभाजी विक्री केंद्राची आहे गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रवास खर्च, आडत व्यापार्‍यांचा नफा, हमाली-तोलाई याचे गणित केल्यास 10 रुपयांची भाजी नागरिकांच्या हातात मिळेपर्यंत 25 रुपये होते. व्यापारी वगळता याचा फटका सर्वसामान्य ग्राहकासह शेतकर्‍यांनाही बसतो. चढय़ा दराने पालेभाजी विक्री रोखण्यासाठी आता थेट पालेभाजी विक्री केंद्र सुरू करण्याची गरज आहे.
बाजार समितीतीत येणार्‍या पालेभाज्या, फळभाज्यांना आडत्यामार्फत विक्री करण्याला प्राधन्य दिले जाते. पण, यामुळे सर्वसामान्यांच्या हातात पालेभाजी मिळेपर्यंत दर अव्वाच्या सव्वा होतात. भाजीपालाचे दर स्थिर ठेवण्यासासठी दोन वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत थेट पालेभाजी विक्री केंद्राची सुरुवात केली होती. पण, शेतकरी आणि ग्राहकाच्या प्रतिसादाअभावी ते केंद्र बंद पडले.
हा होईल फायदा
शेतकर्‍यांना थेट विकता येईल कृषीमाल
खरेदीदार व विक्रे त्याला द्यावा लागणार नाही कोणताही कर
कमी दरात उपलब्ध होईल कृषीमाल
बाजार समिती आणि विजापूर रोडवर सुरु करता येईल केंद्र
असे आहे गणित
शेतकर्‍याने 100 रुपयांचा माल बाजार समितीत आणला तर त्यावर 6 रुपये आडत, 2 रुपये 55 पैसे हमाली आणि 1 रुपये 35 पैसे तोलाई असे 9 रुपये 90 पैसे मोजावे लागतात. तसेच प्रवास खर्च वेगळा लावून विक्री होण्यापूर्वीच 100 रुपयांची वस्तू 120 रुपयांना होते. नंतर या मालाची विक्री करणारा त्रयस्त व्यापारी यावर दोन-पाच रुपये नफा लावतात. सरतेशेवटी 100 ची वस्तू 130 रुपयांना होते. यासाठी केंद्राची आवश्यकता आहे
शेतकर्‍यांमुळेच केंद्र बंद
बाजार समितीने कायमस्वरूपी पालेभाजी विक्री केंद्र सुरूकेले होते. परंतु शेतकरी ती जागा सोडून इतरत्र बसू लागले. तालुक्यातील शेतकरी अजूनही येथेच बसून व्यवसाय करतात. पण तो या केंद्रांतर्गत नाही. हा बाजार बंद होण्यास शेतकरीच जबाबदार आहेत. धनराज कमलापुरे, सचिव, बाजार समिती
प्रतिसाद मिळाला नाही
शेतकर्‍यांच्या सोयीसाठी थेट पालेभाजी केंद्र आम्ही सुरू केले होते. परंतु या उपक्रमाला शेतकर्‍यांचा योग्य प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे ते पुन्हा बंद करण्यात आले. शेतीमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. इंदुमती अलगोंडा-पाटील, माजी सभापती,