आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Negative Wave Against LBT In Solapur Was Felt During Election

सोलापूर विश्‍लेषणः ‘एलबीटी’विरोधाची होती सुप्त लाट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्थानिक संस्था कराच्या मुद्दय़ावरून सोलापूर चेंबर ऑफ कॉर्मसमध्ये फूट पडली. त्यानंतर व्यापार्‍यांची संस्था असलेल्या चेंबरच्या पदाधिकार्‍यांनी व्यापारधर्म पाळणे गरजेचे होते. परंतु प्रमुख संघटनांच्या प्रतिनिधींनाच घरचा रस्ता दाखवून चेंबरच्या पदाधिकार्‍यांनी मालकी हक्कच गाजवला. त्याचीच परिणती म्हणजे व्यापार्‍यांनी या पदाधिकार्‍यांना निवडणुकीतून घरी बसवले. ही एलबीटी विरोधाची सुप्त लाटच म्हणावी लागेल. चेंबर पदाधिकार्‍यांच्या एकाधिकारशाहीचा विषयही या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला.

राज्य शासनाने जकात हटवून 16 महापालिका क्षेत्रात एलबीटी लागू केली. 1 एप्रिल 2011 रोजी सोलापुरात एलबीटी लागू झाली. त्याच्या विरोधात चेंबर ऑफ कॉर्मसने मोर्चा काढला. दरम्यानच्या काळात चेंबरने एलबीटीच्या दरात तडजोड करून कर भरण्याचा निर्णय घेतला. तो काही व्यापार्‍यांना आवडला नाही. विनापर्याय जकात हटलाच पाहिजे, या मागणीतून प्रभाकर वनकुद्गे यांच्या नेतृत्वाखालील ‘व्यापारी महासंघ’ची स्थापना झाली. आणि तम्मा गंभीरे यांच्या नेतृत्वाखालील चेंबरला तडे गेले.

त्यानंतर चेंबरने एकेका संघटनेच्या प्रमुखाची गच्छंती करण्यास सुरवात केली. त्यात प्रभाकर वनकुद्रे, सूत व्यापारी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ करवा, सराफ व्यापारी असोसिएशनचे गिरीश देवरमनी, यंत्रमागधारक संघाचे पेंटप्पा गड्डम, राजू राठी, भांडी व्यापारी संघाचे संजय कंदले यांना बाहेर पडावे लागले. ‘फाम’चे उपाध्यक्ष पशुपती माशाळ यांचाही राजीनामा घेतला. अगदी निवडणुकीच्या तोंडावर उपाध्यक्ष दत्ता सुरवसे यांनाही त्रास दिला. त्यांनी व्यापारी महासंघाच्या ‘एलबीटी हटाव’ पॅनेलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्याच वेळी चेंबरच्या पदाधिकार्‍यांचा पराभव निश्चित झाला होता. एलबीटी हा विषय व्यापार्‍यांच्या जिव्हाळ्याचा बनवण्यात महासंघ यशस्वी ठरले. कायदा झाल्याने तो भरावच लागेल, हे चेंबरचे म्हणणे व्यापार्‍यांच्या गळी उतरवणे शक्यच नव्हते. तरीही चेंबरने त्याबाबतची विधाने करून व्यापार्‍यांचा रोष ओढवून घेतला.

गंभिरेंचा सिद्धेश्वर बँक पॅटर्न?

सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत तम्मा गंभिरे सातत्याने सत्ताधार्‍यांच्या विरोधात पॅनेल उभे करायचे आणि ते एकटेच निवडून यायचे. दिवंगत माजी आमदार वि. गु. शिवदारे यांच्या कार्यकाळापासून ते सत्ताधार्‍यांच्या विरोधातच होते. हा विरोध संपवण्यासाठी शेवटी राजशेखर शिवदारे पुढे आले. गंभिरे यांचे चिरंजीव नरेंद्र यांना बँकेच्या संचालक मंडळावर घेतले. बँकेतून बाहेर पडल्यानंतर तम्मा गंभिरे चेंबरचे अध्यक्ष झाले. विरोधात बोलतील, त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. निवडणुकीत ते बाजूला राहून मुलगा नरेंद्र यांना उभे केले. ही निवडणूक अविरोध होण्यासाठी राजशेखर शिवदारे धावून आले; परंतु उपयोग झाला नाही.