आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nehru's Birth Anniversary 125 People Dead Blood Donation

नेहरू जयंतीनिमित्त १२५ जणांचे रक्तदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरजिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबुटे, अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपिन पटेल, शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रदेश सचिव धर्मा भोसले, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरामध्ये गोपाबाई दमाणी ब्लड बँक, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अश्विनी ब्लड बँक, सिध्देश्वर ब्लड बॅँक, छत्रपती शिवाजी महाराज ब्लड बँक, संजीवनी ब्लड बॅँक आदी रक्तपेढ्यांनी रक्तसंकलनासाठी सहकार्य केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सातलिंग शटगार, बाळासाहेब डुबे पाटील, राजेश पवार, गौरव खरात, जयसिंग पाटील, जीवनदत्त आरगडे, गुरुनाथ म्हेत्रे, विक्रांत पाटील, गिरीश शेटे आदींनी सहकार्य केले. शिबिराचे उद््घाटन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.