आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपाइंकडून १३ जागांची मागणी, नेिटजन्सची शेरेबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - फाटाफूट आणि एकोप्याच्या अभावी सर्वच दलित पक्षांची सत्तासमीकरणात दोलायमान स्थित होत असल्याचे आजवर महाराष्ट्राने पाहिले आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइंने महायुतीकडे १३ जागांची केलेल्या मागणीची सोशल मीडियावर तिरकस प्रतिक्रिया देऊन यथेच्छ खिल्ली उडवली जात असल्याचे दिसून आले. नेटिझन्सच्या या काही
बोलक्या प्रतिक्रिया...
सध्याच्यामहागाईचा रेट बघितला तर रिपाइंने १३ जागांची मागणी करावी, हे बरोबर आहे. पण मोदी सरकारने जर काही ठोस पाऊल उचलून महागाई कमी केली तर येत्या पाच वर्षांत जागांची मागणीही घटेल असे वाटते.
रिपाइंने केवळ १३ जागा मािगतल्या. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्रिपद मािगतले का? असा खोचक सवालही एकाने केला आहे.

विधानसभेच्या १३ जागा समजू शकतो. पण राज्यपालपद, महामंडळे, विधानपरिषदेत जागा या जागांवर आगामी निवडणुकीतील यशानंतर मागणी असणार आहे, तर २०१७ मध्ये राष्ट्रपतीपद. अशी शेरेबाजीही यानििमत्ताने करण्यात आली.