आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर चेंबरची सूत्रे नव्या संचालकांकडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर चेंबर ऑफ कॉर्मस अँण्ड इंडस्ट्रीजची सूत्रे रविवारी नव्या संचालकांनी घेतली. मावळते अध्यक्ष तम्मा गंभिरे, उपाध्यक्ष कुमार करजगी, मानद सचिव केतन शहा, टेहलियाराम आनंदानी यांनी सन्मानपूर्वक अधिकाराची सूत्रे नव्यांकडे सुपूर्द केली.

हॉटेल त्रिपूरसुंदरीतील कमला दालनात सायंकाळी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. शहा यांनी गतवर्षातील कामाचा आढावा घेतला. त्यानंतर विविध संस्था, संघटना, बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या चेंबरच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विद्यमान पदाधिकार्‍यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष होते. नरेंद्र पाठक यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव बशीर शेख यांनी आभार मानले.

चेंबरचे सदस्यत्व नसल्याने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर वनकुद्रे, सचिव राजू राठी, विश्वनाथ करवा, पेंटप्पा गड्डम, गिरीश देवरमनी आदी मंडळी सभेला अनुपस्थित होती.