आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Bus Transport Stop Due To Tyre In Solapur Depot

टायर नसल्याने नव्या गाड्या बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - परिवहन विभाग तोट्यात आहे. रस्त्यावर धावणार्‍या बसची संख्या 72 वरून 39 झाली आहे. नव्या गाड्या टायर नसल्याने महिन्यापासून थांबून आहेत. कामगारांच्या वेतनासाठी दोन कोटींची गरज आहे. त्यांची मानसिकता ढासळत आहे.

रोज लाखाने उत्पन्न घटले, 39 बस मार्गावर.
सहा मिनी बस टायर व ब्रेक लायनर अभावी महिना झाले बंद.
रोज एका बसचे 2500 रुपये प्रमाणे 75 हजार नुकसान.
संपानंतरही कर्मचार्‍यांचे वेतन नाही.
सोमवारी प्रभारी परिवहन व्यवस्थापक प्रकाश गिरीना अडवले.
चॉइस कंपनीच्या 20 बस बिल दिले नाही त्यामुळे त्यांनी बंद ठेवल्या आहेत.
बस बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था नसल्याने अडचण.
शेळगी, राजस्व नगर, गोदूताई परूळेकर विडी कामगार वसाहत, ज्ञानेश्वर नगर, घरकुल, नीलम नगर, साखर कारखाना असे 12 मार्गावर बस बंद.

चार बस गाड्या टायरविना उभ्या
सात रस्ता डेपोत एक महिन्यापासून चार मिनी बस टायर व ब्रेक लायनर नसल्याने बंद आहेत. त्यांना पुढील महिन्यात सेवेत येऊन एक वर्ष होईल.

टायर मागवले आहेत
सहा मिनी बस टायर नसल्याने बंद आहेत. त्याशिवाय इतर बस बंद आहेत. टायर खरेदीसाठी आर्थिक तरतूद नाही. सोमवारी 15 टायर मागवले आहेत. ते आल्यानंतर बसवण्यात येतील.’’ प्रकाश गिरी, प्रभारी परिवहन व्यवस्थापक

टायर मागवले आहेत
सहा मिनी बस टायर नसल्याने बंद आहेत. त्याशिवाय इतर बस बंद आहेत. टायर खरेदीसाठी आर्थिक तरतूद नाही. सोमवारी 15 टायर मागवले आहेत. ते आल्यानंतर बसवण्यात येतील.’’ प्रकाश गिरी, प्रभारी परिवहन व्यवस्थापक