आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New City Development Plan On December End Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिसेंबरअखेर तयार होणार शहर विकासाचा आराखडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेचे नूतन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार घेताच दूरदृष्टीने धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या (जेएनयूआरएम) योजना शहरात आणण्यासाठी शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासंबंधीची प्राथमिक बैठक बुधवारी आयुक्तांच्या कक्षात झाली. शहर विकास आराखडा तयार झाल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 80 टक्के अनुदान केंद्र सरकार, 10 टक्के राज्य शासन तर 10 टक्के महापालिकेचा हिस्सा असेल.

हुतात्मा स्मृती मंदिराच्या मागे महापालिकेच्या जागेत ‘सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी पार्क’ या कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात आलेआहे. कंपनीच्या अधिकार्‍यांनी पालिका अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. कंपनीला आवश्यक ती माहिती देण्यासाठी 18 अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

शहरासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा अहवाल तयार करणे, शासकीय योजनेच्या आवश्यकतेनुसार आराखडा करणे, महापालिकेच्या उणिवा स्पष्ट करणे, आगामी 45 वर्षांचे नियोजन करून नियोजन आराखडा तयार करणे आदी कामे सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी ही पुणेस्थित कंपनी करणार आहे. महापालिकेकडून माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. यासंबंधाने बुधवारी महापालिका आयुक्त आणि अन्य अधिकार्‍यांसोबत प्राथमिक बैठक झाली. यावेळी महापालिका अधिकार्‍यांसह ‘सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी पार्क’चे अधिकारी राम अय्यर, महेश हरारे, श्रीनिवास देशपांडे, सोनाली भट्टाचार्य, अविनाश सोनवणे, जयेश भाटिया उपस्थित होते. ई गव्हर्नस, ग्रीन पार्क, शहर विकास या तीन मुद्यावर माहिती यावेळी देण्यात आली.

कमिटी स्थापन
स्थापन करण्यात आलेल्या समितीत नगर अभियंता सुभाष सावस्कर, लक्ष्मण चलवादी, डॉ. जयंती आडके, सुकेश गोडगे, अजित खंदारे, झेड. एम. नाईकवाडी आदींचा समावेश आहे.