आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"पंचसूत्री"द्वारे शहर विकास साधणार, आयुक्त काळम यांची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील कचरा, पाणीपुरवठ्याचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्याबरोबरच उद्यान, मुख्य रस्त्यावरील वाहतूक मनपा कार्यालयातील स्वच्छता या पंचसूत्री कार्यक्रमावर भर देणार असल्याचे महापालिकेचे नूतन आयुक्त विजयकुमार काळम यांनी सांगितले.

सोलापूर महापालिकेचे ३१ वे आयुक्त म्हणून काळम यांनी शुक्रवारी सकाळी पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची माझी पद्धत आहे. पण बेकायदेशीर काम होत असेल तर तेथे तत्काळ कडक भूमिका घेतली जाईल. महापालिका कर्मचारी चुकत असेल तर एक किंवा दोनवेळा समजून सांगण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या कामाला प्राधान्य
एलबीटीवसुली, बीओटी योजना, वीज बिलात बचत करण्यासाठी एलइडी दिव्यांचा वापर, विकास शुल्कची नियमाप्रमाणे वसुली, मंडई विकास करून उत्पन्न वाढवणे, मनपाचे दाेन दवाखाने मल्टिस्टेट रुग्णालय करणार, धर्मवीर संभाजी आणि सिध्देश्वर तलाव सुधारणा, कराचे रिव्हिजन करणे. पार्क स्टेडियमवर हिरवळ, जलतरण तलाव सुधारणा. ई-लर्निंग शिक्षण.
मनपाची आर्थिक स्थिती पाहता एलबीटीचे असेस्टमेंट होणे बंधनकारक आहे. ते करण्यासाठी मनपाकडे तज्ज्ञ नाही. एलबीटी वसुलीसाठी नेमण्यात आलेले सीए माधव कडदास यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. एलबीटी वसुलीबाबत कडक भूमिका घ्यावी लागेल. महापालिका गाळ्यांचा विषय महत्त्वाचा अाहे. याबाबत व्यापारी, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मनपाचे धोरण स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनपा प्रश्नाबाबत नूतन आयुक्तांनी चांगला अभ्यास केल्याचे दिसून आले.
१५ दिवसांत परिवहनच्या १२५ सिटीबस रस्त्यावर आणणार

महापालिकेचाउपक्रम असलेल्या परिवहन विभागात १२५ बस आहेत, पण वाहक चालक नाहीत. पंधरा दिवसांत सर्व बस रस्त्यावर धावतील. त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त विजयकुमार काळम यांनी सांगितले.
सोलापुरात येण्याची कारणे

- मुळगाव अंबेजोगाई‑ पासून सोलापूर जवळ आहे.
- आव्हाने असलेल्या ठिकाणी कामाची आवड
- शासनाला सहकार्य करण्याचे नेहमीच धोरण
- ग्रामीण भागानंतर शहरात कामाची संधी मिळाली

कामाची पाच सूत्रे
- सर्वसामान्य नागरिक : सर्वसामान्यनागरिकांच्या हितासाठी मी येथे आलो आहे. कार्यालयीन बैठका व्यतिरिक्त नागरिक मला भेटू शकतात. काही वेळा काम करताना आर्थिक निगडित बाबीशी संबंधित असतात. त्यामुळे मर्यादा येतात. नळ, बांधकाम अनधिकृत असेल तर ते अधिकृत करून घ्यावे.
- शासकीयकार्यालय : जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद कार्यालयांना महापालिकेचे सहकार्य राहील.
- गैरव्यवहार: शासकीय प्रॉपर्टीचे गैरव्यवहार होत असतील तर संबंधितांवर फौजदारी दाखल करण्यात येईल.
- कर्मचारी : महापालिका कर्मचाऱ्यांना माझ्या गतीने काम करावे लागेल. लातूर येथे असताना भूकंप काळात २३ गावांचे पुनर्वसन आराखड्यास दीड महिन्याची मुदत असताना साडेसहा दिवसांत केले. चुकणाऱ्यांना एक किंवा दोनवेळा सांगून संधी देणार. त्यानंतर कारवाई करण्याची भूमिका घेतली जाईल.
- पदाधिकारी: पदाधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. त्यांनी कामकाजात पारदर्शकपणा आणि व्यवस्थितपणा दाखवावा. कायदेशीर भूमिका मांडवी. लोकहिताची कामे सांगावीत. लोकहिताची भूमिका नसेल तर त्यांना साथ देणार नाही.
मनपा कार्यालयाची स्वच्छता

वाहतूक सुरळीत करणे
पाणीपुरवठा सुरळीत करणार
उद्यानामध्ये सुधारणा करणे
शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन
संकल्पाने काम करण्यावर भर
२८वर्षाच्या काळात संकल्प करून कामे केली आहेत. शक्ती, युक्ती आणि भक्तीचा अवलंब करून काम करताना कधी अपयश आले नाही. सोलापुरात येताना मी काही कल्पना घेऊन आलो आहे. मी कोणाला समजून सांगतो, कायदेशीर नोटीस देतो तरीही ऐकले नाही तर जनतेसमोर उभा करतो. विजयकुमारकाळम, आयुक्त मनपा

नूतन मनपा आयुक्त विजयकुमार काळम यांचे स्वागत करताना उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, सहायक आयुक्त अमिता दगडे, प्रदीप साठे, प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे, मुख्यलेखापाल सुकेश घोडगे, भारत वडवेराव आदी. अधिकारी उपस्थित होते.
लातुरात पोलिसाची भूमिका

लातूर येथे डिसेंबर १९८९ मध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती. त्यावेळी गंज चौकात दगडफेक होत असताना काळम यांनी पोलिसांची भूमिका घेत लाठीचार्ज करून परिस्थिती हाताळली.