आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोज सकाळी पोलिसांना घेऊन करणार व्यायाम, नवे आयुक्त सेनगावकरांचा फंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आयुष्य खूप सुंदर आहे. आनंदाने जगा, गरजा कमी ठेवा, खर्च कमी होईल. सकारात्मक वृत्ती हवी. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि तणावमुक्तीसाठी दररोज व्यायाम आणि प्राणायाम करा. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसन करू नका. परिवाराला दररोज वेळ द्या. थोडेच पण चांगले काम करा. नसलेले दाखवण्यापेक्षा आपले वागणे नैसर्गिक असू द्या. त्यामुळे आनंदी राहू. हा बदल करण्यासाठी मीच आता स्वत: दररोज सकाळी पावणेसहाला पोलिस कर्मचाऱ्यांना (ज्यांना रात्र गस्त नाही) सोबत घेऊन व्यायाम करणार आहे, असा दिलखुलास संवाद नवे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी साधला. मंगळवारी सायंकाळी दैनिक "दिव्य मराठी'ला श्री. सेनगावकर यांनी सदिच्छा भेट दिली. निवासी संपादक संजीव पिंपरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
अॅपेरिक्षांवर कारवाई
बसस्थानक,रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक सुरळीत करत आहोत. त्यानंतर ट्रीपल सीट, मोबाइलवर बोलणे, लेन कटिंग (रस्ता पार करणे) यावर जागृती होईल. पोलिसांचे काम वाहतूक सुरळीत ठेवणे आहे. दंडात्मक कारवाई नाही. नाक्यावर महामार्गावर थांबणारे पोलिस आता तुम्हाला दिसत नाहीत. पुढच्या टप्प्यात अॅपेरिक्षा, स्क्रॅप रिक्षा यावर कारवाई मोहीम असेल. हळूहळू बदल दिसू लागेल.
संवादातील ठळक मुद्दे...!
- पोलिसांच्या वाहनावर जीपीएस यंत्रणा, डिजिटल नियंत्रण कक्ष होणार
- पोलिसांच्या कामात सुधारणा होण्यासाठी प्रशिक्षण देणार
- पंचावन्न टक्के गुन्हे डिटेक्ट आहेत. त्यात आणखी भर पडेल
- प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी असेन. कामचुकारांना मात्र शिक्षा.
- नागरिकांनी माहिती दिली, मदत केली तर त्यांचा जाहीर सत्कार
- आपली माहिती मला फोन, मेसेज, व्हॉट्सअॅपवर सांगा, लगेच मदत मिळेल.
बातम्या आणखी आहेत...