आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महालक्ष्मीच्या सजावटीसाठी आलाय नवा साजशृंगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पाहता पाहता गणेशोत्सव 15 दिवसांवर आला आहे. त्यापाठोपाठ येणार्‍या श्री महालक्ष्म्यांची जय्यत तयारी करतानाचे बाजारपेठत चित्र आहे. या महालक्ष्मीच्या साजशृंगारात भर टाकण्याकरिता यंदा विशिष्ठ प्रकारच्या रेडिमेड भरजरी साड्या आणि शालू विक्रीस आलेले आहेत.

भरजरी काठपदराच्या आणि संपूर्ण हिरव्या सौभाग्य-सवाष्ण साड्यांना मागणी वाढत आहे. शिवाय या साड्या इतक्या आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आली आहे की, एक फुटापेक्षाही लहान कलशावर विराजमान करण्यात येणार्‍या श्रीफळाच्या आणि मुखवट्याच्या मूर्तींना व्यवस्थित बसतात. साध्या एकरंगी हिरव्या रंगातील सवाष्ण साडीपासून अस्सल पैठणीपर्यंत बनवलेल्या भरजरी साड्याही विक्रीस बाजारात आलेल्या आहेत. मराठा वस्ती परिसरात राहणार्‍या श्रीदेवी पाटील या गृहिणीने हौसेखातर हा व्यवसाय सुरू केला, परंतु आज बाजारात केवळ त्यांनी बनवलेल्या साड्यांनाच मागणी आहे.


हौसेतून सेवा
हौस म्हणून काही वर्षांपूर्वी घरातील लक्ष्मीला अशाप्रकारची साडी बनवली होती. हळदी-कुंकवास आलेल्या महिलांनी त्याची तारिफ केल्यावर शिवणकला येत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर दहा साड्या बनवल्या. आता सध्या बाजारात याची मागणी पाहता काम वाढवले आहे. श्रीदेवी नागेश पाटील


ज्यांच्या घरी उभी लक्ष्मी नसते ते तांब्याच्या कलशावर नारळ अथवा लक्ष्मीचा मुखवटा ठेवून पूजा करतात.
अशा बैठय़ा लक्ष्मीसाठी ही साडी असून ही नेसवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. रेडिमेड असल्याने साडीच्या निर्‍या, पदर आणि सजावट त्यातच करण्यात आली आहे.


दोन मिनिटांत साडी नेसवता व पुन्हा काढून ठेवता येते.
साधी चमकी साडी : 80
सौभाग्य सवाष्ण : 150
कोल्हापुरी साज : 200
कोल्हापुरी जरी : 250
नवलाखी पैठणी : 350
प्रकार व किंमत (रुपयांत)