आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Film: Welcome To Jungle Realsing On 30 August

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा चित्रपट: ‘वेलकम टू जंगल’ 30 ऑगस्टला पडद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मराठीतील पहिला सायन्स फिक्शन ‘वेलकम टू जंगल’ चित्रपट 30 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्रात प्रदर्शित होत असल्याची माहिती चित्रपटाचे लेखक नितीन कुलकर्णी यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना दिली. यात कालाय तस्मै नम: फेम अभिनेत्री रुचिता जाधवची मुख्य भूमिका आहे. संजय के. जाधव यांचे दिग्दर्शन आहे. जंगलातील रहस्यांचा शोध घेणारी कथा आहे. या वेळी आविष्कार फिल्म सोसायटीचे विठठ्ल बडगंची, युसूफ पटवे, रमेश खाडे उपस्थित होते.
स्पेशल इफेक्टमुळे चित्रपटाचे बजेट दोन कोटींच्या घरात गेल्याचे नितीन कुलकर्णी यांनी सांगितले. निर्मिती देवेंद्र चौगुले यांची आहे.


प्रेक्षकांना वेगळा विषय देणारी कथा असल्याचे रुचिताने सांगितले. साहाय्यक अभिनेता स्नेहल सकपाळने थरार दृश्यांच्या चित्रिकरणासाठी डमीचा वापर केला नसल्याची माहिती दिली. आंबा घाटात याचे चित्रण झाले आहे.


वेगळय़ा प्रवासाची सुरुवात होईल
अनेक मालिका व चित्रपटांत काम केले आहे. त्यातील सास-बहुंची इमेज तोडून स्टंटवुमन पाहायला मिळणार असल्याचे रुचिताने सांगितले. पुढील कारकिर्दीस या भूमिकेमुळे हातभार लागेल, असेही तिने स्पष्ट केले.