आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील महिन्यात नवे महापौर; कोठेंमुळे काँग्रेसला आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापौर अलका राठोड यांच्या पदाची मुदत नियमानुसार पाच सप्टेंबर रोजी संपत आहे. नवीन महापौरांची निवड होण्यापूर्वीच नगरविकास खात्याकडून या पदासाठी आरक्षण सोडत निघणार आहे. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. दरम्यान, मनपा सभागृह नेते महेश कोठे हे कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेल्याने ते कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांना युतीकडे वळवण्याचा प्रयत्न करतील.

माकप, बसप, रिपाइंची भूमिका महत्त्वाची
माकपच्या नगरसेविका सुनंदा बल्ला, माशप्पा विटे, महादेवी अलकुंटे आणि बसपाचे आनंद चंदनशिवे, उषा शिंदे, सुनिता भोसले आणि रिपाइंचे (आठवले गट) रवी गायकवाड यांची भूमिका येत्या काळात महत्त्वाची ठरणार आहे. आडम यांच्या आदेशानुसार भूमिका घेणार असल्याचे माकप नगरसेवकांनी सांगितले.

14 नगरसेवक गैरहजर राहिल्यास पालिकेत येईल भाजप-सेनेची सत्ता
महापालिकेत 102 नगरसेवक असून त्यापैकी माकपा 3, बसपाचे 3 असे सहा नगरसेवक महापौर निवडीच्या वेळी तटस्थ राहिल्यास 96 राहतात. त्यापैकी महेश कोठे यांचे नगरसेवकपद पक्षांतर केल्याने रद्द झाले तर 95 नगरसेवक मतदान करतील. या स्थितीत 48 नगरसेवक महापौर ठरवतील. सध्या महायुतीकडे 34 नगरसेवक आहेत. तांत्रिक कारण पुढे करत महेश कोठे यांनी निवडीच्या वेळी आपल्या प्रभावाखालील 14 नगरसेवकांना गैरहजर ठेवले तर महापालिकेत सत्तांतर घडू शकते.