आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Solapur Commissioner Visit Different Departments

पालिकेतील अस्वच्छतेने आयुक्त काळम अचंबित, पंधरा दिवसांत सफाईची दिली हमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेचे नवे आयुक्त विजयकुमार काळम यांनी शुक्रवारी सकाळी पदभार घेतला. त्यानंतर लगेच त्यांनी महापालिका प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. घाण आणि कार्यालयातील फाइल व्यवस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शहरातील नागरिकांना स्वच्छता करा असे सांगत असता, तर आपले कार्यालय स्वच्छ का नाही, स्वच्छतागृहे साफ केली जात नाहीत. त्यामुळे जनतेला स्वच्छतेबाबत सांगण्याचा अधिकारी महापालिकेला राहणार नाही? असे म्हणत पाच दिवसांत पालिकेच्या कार्यालयात स्वच्छता दिसेल, असे आयुक्त काळम म्हणाले.

महापालिका कार्यालयात शिस्त नाही, विद्युत दिवे कधी चालू तर कधी बंद अशी अवस्था आहे. त्यामुळे एलईडी दिवे बसवून वीज बिल बचत करून त्यातून नागरिकांना रस्ते देण्याचा प्रयत्न करू. मनपा कार्यालयाची दयनीय आवस्था आहे. शौचालय स्वच्छतागृह कधी धुतले माहीत नाही. आपलं घर नीट नाही तर जनतेला काय भाषण देणार? असा प्रश्न आहे. मी माझे कार्यालय स्वच्छ ठेवणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले कार्यालय स्वच्छ ठेवावे. पुढील पाच दिवसांत याचा प्रभाव दिसेल.

सर्व विभाग पाहिले

आयुक्तकाळम पाटील यांनी सर्व विभागांची पाहणी केली. शौचालय पाहिले. गच्चीवर जाऊन तेथील स्थिती पाहिली. अशी पाहणारे ते पहिले आयुक्त आहेत.

पाचदिवसांत सफाई

महापालिकेची कार्यालये अस्वच्छ आहेत. आगामी पाच दिवसांच्या काळात कार्यालयात स्वच्छता दिसेल. चांगले आणि उत्तम शहर केले जाईल. रस्ते महिला बचत गटाकडून साफ करून घेतले जातील.” विजयकुमार काळम, नूतन आयुक्त, महापालिका