आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Speaker Selection For Solapur Corporation On Thursday

महापालिका समिती सभापती निवड गुरुवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या विविध सात विषय समिती सभापतिपदाची निवड गुरुवारी होणार आहे. महापालिकेच्या एप्रिलमधील सर्वसाधारण सभेत विविध सात विषय समिती सदस्यांची निवड झाली आहे. या सदस्यांमधून सभापतींची निवड होईल. बुधवारी सकाळी सभापतिपदासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
सभापती निवडीची तारीख विभागीय आयुक्त कार्यालयाने जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. ३० एप्रिल २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजता महिला बालकल्याण तर सकाळी ११.१५ वाजता स्थापत्य समिती, दुपारी १२ वाजता शहर सुधारणा, १२.४५ वाजता आरोग्य समिती, वाजता मंड्या उद्यान, २.४५ वाजता विधी समिती, ३.३० वाजता कामगार आणि समाजकल्याण समितीच्या सभापतींची निवड होणार आहे.२९ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी यावेळेत अर्ज दाखल करता येईल. मतदान हात उंच करून होणार आहे, अशी माहिती मनपा नगरसचिव पठाण यांनी दिली.