आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Syllabus Start At Solapur For Corporate Department

सोलापुरात सहकार खात्याकडून यंदा नवीन अभ्यासक्रम सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सहकार खात्याकडून घेण्यात येणार्‍या ‘गव्हर्नमेंट डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँण्ड अकौंटन्सी’ (जी.डी.सी. अँण्ड ए.) या परीक्षेसोबतच यंदापासून सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. जी.डी.सी. अँण्ड ए. परीक्षेच्या सहा विषयांपैकी पहिले तीन विषय उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना याबाबतचे प्रमाणपत्र मिळेल. मात्र, त्यासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागणार आहे.

सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक र्शीकांत मोरे यांनी याबाबतची माहिती दिली. सोमवार (ता. 21)पासून 11 फेब्रुवारीपर्यंत या अभ्यासक्रमाच्या अर्जांची विक्री होईल. त्यानंतर 16 फेब्रुवारीपर्यंत त्या स्वीकारण्यात येतील. अर्जाची किंमत 50 रुपये तर परीक्षा शुल्क 800 रुपये आहे. शिवाय गृहनिर्माण प्रमाणपत्र परीक्षेसाठी 500 रुपये शुल्क आहे. या दोन्ही परीक्षा मे महिन्यातील 25, 26 आणि 27 रोजी होतील.

कुठल्याही शाखेची पदवी किंवा सहकारी संस्थांमध्ये लिपिक पदावर असणारे दहावी उत्तीर्ण उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतील. राज्यातील 16 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी केंद्र क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आला आहे. इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नवीन प्रशासकीय इमारतीतल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात संपर्क साधावा. दूरभाष क्रमांक 0217-2629749.

नव्या धोरणांची माहिती
राज्य शासनाने गृहनिर्माण संस्थांची धोरणे बदलली आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडील कामे, त्यानंतर संस्थांची कामे काय असतील याबाबतचे कायदे, नियम या अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आली. एकूणच गृहनिर्माण संस्थांमध्ये असणार्‍यांसाठी हे प्रमाणपत्र उपयोगी आहे.’’
-दत्ता मोरे, अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक कार्यालय