पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी शहराबाहेर उभारलेल्या तात्पुरत्या एसटी बसस्थानकापासून शहरात येण्यासाठी प्रचलित रिक्षा भाडे दर विचार घेऊन वाहतूक शाखेचे भाडेपत्रक तयार केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रशांत कदम यांनी दिली. यानुसार भाविकांनी भाडे द्यावे. जादा भाडे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यात्राकाळात शहराबाहेर उभारलेल्या चंद्रभागा व भीमा एसटी बसस्थानकांपासून शहरात ये-जा करण्यासाठी रिक्षाचालक भाविकांकडून जादा भाडे घेतात. तसेच अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यांची दखल घेत पोलिस, परिवहन विभाग व स्थानिक रिक्षा संघटनांच्या पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली.
मार्ग प्रवाशांचे प्रति प्रवासी
नवीन सोलापूर नाका ते चंद्रभागा स्थानक 11 04
नवीन सोलापूर नाका ते अहिल्यादेवी चौक 26 09
नवीन सोलापूर नाका ते भिमा बस स्थानक 56 19
चंद्रभागा स्थानक ते नवीन सोलापूर नाका 11 04
चंद्रभागा स्थानक ते अहिल्यादेवी चौक 30 10
चंद्रभागा स्थानक ते भिमा बस स्थानक 60 20
अहिल्यादेवी चौक ते भिमा बस स्थानक 30 10
अहिल्यादेवी चौक ते नवीन सोलापूर नाका 26 09
अहिल्यादेवी चौक ते चंद्रभागा स्थानक 30 10
शेगाव दुमाला चौक ते तीन रस्ता चौक 11 04
शेगाव दुमला चौक ते भीमा बस स्थानक 20 07
भीमा बस स्थानक ते अहिल्यादेवी चौक 31 10
भीमा बस स्थानक ते नवीन सोलापूर नाका 56 19
भीमा बस स्थानक ते चंद्रभागा स्थानक 60 20
तीन रस्ता चौक ते शेगाव दुमाला चौक 11 04
तीन रस्ता चौक ते भीमा बस स्थानक 20 07
भीमा बस स्थानक ते तीन रस्ता चौक 11 04
भीमा बस स्थानक ते शेगाव दुमाला चौक 11 04