आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New TET Cut Of Declare, Examination Council Decision

‘टीईटी’ची कट ऑफ नव्याने जाहीर होणार,परीक्षा परिषदेचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टेट) मराठी, इंग्रजी व उर्दू या तीन्ही माध्यमांतील प्रश्नपत्रिकेतील 38 प्रश्न रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आह़े त्यासोबतच परीक्षेच्या दोन्ही पेपरमधील 19 प्रश्नांचे पर्यायही चुकीचे आढळून आल्याने या परीक्षेसाठीचा कट ऑफही नव्याने जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यभरातील 7 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी 15 डिसेंबर 2013 रोजी परिषदेने ही परीक्षा घेतली होती़ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आल्याने शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या सर्व उमेदवारांनी या परीक्षेला प्राधान्य दिले होत़े
या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरचे आणि कठीण प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप काही उमेदवारांकडून करण्यात आला होता़ तसेच फेरपरीक्षा घेण्याची मागणीही करण्यात येत होती. दरम्यान, राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या ‘आन्सर की’मधील उत्तरांविषयी संबंधित उमेदवार, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि इतर तज्ज्ञांकडून सूचना आणि आक्षेप मागवले होत़े यासमितीने अंतिम आन्सर की संकेतस्थळावर जाहीर केल्याची माहिती सहस्रबुद्घे यांनी दिली़
पुढील आठवड्यात निकालाची शक्यता
या परीक्षेच्या दोन्ही पेपरसाठीच्या आन्सर की जाहीर करण्यासोबतच परिषदेने प्रश्नपत्रिकांची फेरतपासणी करण्यासाठी एक समितीही नेमली होती़ उमेदवारांकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत या समितीने आपली मते नोंदवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संचालक दिलीप सहस्रबुद्धे यांनी सांगितले. दरम्यान, या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.