आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी शहरात 94 हजार लिटर मदिरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मंगळवारी शहर आणि जिल्ह्यातील मद्यालयांनी मोठी सज्जता ठेवली. मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह नवा मेनू घेऊन ग्राहकांना आकर्षित करत आहे. मध्यरात्रीपर्यंत चालणार्‍या हॉटेलांमध्ये साधारण 94 हजार लिटर दारू रिचवली जाईल. शिवाय टनभर मटन आणि तेवढेच चिकनही फस्त होण्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

हॉटेल, ढाबा, गार्डनमध्ये ग्राहकांच्या स्वागताची मोठी तयारी झाली. बहुतांश हॉटेल्सनी पूर्वनोंदणी घेऊन नियोजन केले. काही शाकाहारी हॉटेलनी ‘फक्त फॅमिली’ची विशेष सोय केली आहे. परमिट रूमचालकांनी मद्याचा पुरेसा साठा करून ठेवला.

दैनंदिनपेक्षा दुप्पट मद्याची विक्री होईल, असा त्यांचा कयास आहे. मटन, चिकन आणि चायनीजच्या प्रकारांतले मेनू तयार असल्याचे चालकांनी सांगितले. अनेक जण मात्र घरच्या घरीच नववर्षाचे स्वागत करण्याचे बेत आखत आहेत. हॉटेलमधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घरीच घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

वर्षातून एकदा
431 डिसेंबर हा हॉटेलचालकांचा वर्षातून एकदा येणारा जणू उत्सवच. ग्राहकांच्या मागणीनुसार सेवा देणे, त्यांना आनंदित करणे आणि नव्या वर्षाचे स्वागत करणे हेच आमचे काम. यंदाही होणार्‍या या उत्सवातून चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे.’’ संजीव इंदापुरे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र खाद्यपेय विक्रेता महामंडळ

व्हिस्की आणि बिअर
24 हजार लिटर व्हिस्की
70 हजार लिटर बिअर

शहर व जिल्ह्यातील मद्यालये
परमिट रूम : 89
बिअर शॉपी : 84
वाइन शॉप : 60