आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या झोन रचनेत युतीला मिळणार ठेंगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या झोनचा नवीन आराखडा तयार करण्यात आला. सहाऐवजी आठ झोन तयार करण्यात आल्याने झोनची संख्या दोनने वाढली. झोन रचनेत युतीला एकही झोनचे सभापतीपद मिळत नसल्याने त्यांना ठेंगा मिळाला. काँग्रेसबरोबर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेसच्या मदतीने दोन झोनवर सत्ता मिळवता येईल.
शहरात आठ झोन तयार करण्यात आले असून त्यास अंतिम रूप देण्यात आले आहे. यात सत्ताधारी काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे. राष्ट्रवादी गटनेता दिलीप कोल्हे यांच्या वर्चस्व असलेल्या लक्ष्मी-विष्णू चाळ येथील झोन कार्यालयावर काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते. या झोनमध्ये शिवसेना तीन, राष्ट्रवादी पाच, तर काँग्रेसचे चार सदस्य आहेत. एक नंबर झोनमध्ये 12 सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक असल्याने तेथे सभापतीपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक एक ते 10 मध्ये भाजपचे प्राबल्य असताना युतीच्या वाट्याला एकही झोन समिती सभापती मिळत नाही. झोन समितीत युतीला ठेंगा मिळाल्याने भाजपत कमालीची नाराजी आहे.
भौगोलिक रचना पाहिली
शहरातील नागरिकांना झोन कार्यालयात जाताना त्रास होऊ नये म्हणून भौगोलिक रचना पाहून कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. 1 जुलैपासून कार्यालये सुरू होतील. यात राजकीय काही संबंध नाही.’’ महेश कोठे, सभागृह नेते, महापालिका
युतीला मुद्दाम डावलले
महापालिकेत युतीचे 33 नगरसेवक असताना एकही झोन सभापती मिळू नये अशी रचना करण्यात आली. एक सभापतीपद देण्याचे मान्य केले होते, पण दिले नाही. युतीला मुद्दामहून डावलले.’’ रोहिणी तडवळकर, विरोधी पक्षनेत्या
झोननिहाय पक्षांचे प्राबल्य याप्रमाणे
झोन क्रमांक 1 : अंत्रोळीकर शॉपिंग सेंटर, दत्त चौक : प्रभाग क्र. 7, 8, 9, 12, 13, 27. राष्ट्रवादी 6, भाजप 2, बसप 2, काँग्रेेस 2
झोन क्रमांक 2 : राजेंद्र चौक : प्रभाग क्र. 1, 2, 3, 4, 17, 18, 19. भाजप 2, काँग्रेस 8, बसपा 1, आरपीआय 1
झोन क्रमांक 3 : राजेंद्र चौक : प्रभाग क्र. 5, 6, 15, 16, 20, 21. भाजप 5, कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी 2
झोन क्रमांक 4 : गुरुनानक चौक : प्रभाग क्र. 38,43, 39,41, 40, 51. भाजप 4, काँग्रेस 8
झोन क्रमांक 5 : गुरुनानक नगर : प्रभाग क्र. 50, 42, 45, 47, 48, 49. भाजप-सेना 5, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 1
झोन क्रमांक 6 : लक्ष्मी-विष्णू चाळ : प्रभाग क्र.10, 11, 28, 29, 30, 46. शिवसेना 3, कॉंग्रेस 4, राष्ट्रवादी 5
झोन क्रमांक 7 : डफरीन हॉस्पिटल : प्रभाग क्र. 14, 25, 23, 26, 31, 32. भाजप 4, कॉंग्रेस 7, राष्ट्रवादी 1
झोन क्रमांक 8 : डफरीन हॉस्पिटल : प्रभाग क्र. 22, 24, 33, 34, 35, 44, 36, 37. भाजप 5, कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी 3, माकपा 3